नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : आज बाजारात उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. सकाळी 9.40च्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर(MCX) 236.00 रुपयांनी सोन्यात घसरण झाली. यासह 10 ग्रॅम सोन्याचा दर 51 हजार 780 00 रुपये झाली आहे. तर चांदीच्या दरातही घट झालेली पाहायला मिळत आहे. चांदीच्या किंमतीत 860 रुपयांनी घट झाली आहे. यासह चांदी 66 हजार 207 रुपये प्रति किलो झाली आहे. तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन सत्रांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या घसरणीचे मोठे कारण अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह बँकेचे Meeting Minutes आहेत. या Meeting Minutes मधून असे संकेत मिळाले आहेत की, 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय बँकेच्या बैठकीत व्याजदरामध्ये कमतरता जारी राहणार आहे. वाचा- महत्त्वाचं! सोन्याची विक्री करताना किती इनकम टॅक्स द्यावं लागेल, वाचा सविस्तर गुंतवणूक होईल फायद्याची जर तुम्हाला सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. जर तुम्ही सोन्याच गुंतवणूक केली तर एका वर्षात 20 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या एका महिन्यात सोने 1850 ते 2000 डॉलर प्रति आउंसपर्यंत असेल. ऑगस्ट महिन्यात सोन्यातून सर्वात जास्त फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. वाचा- 1.46 लाखांपर्यंत पोहोचेल 10 ग्रॅम सोन्याचा भाव, या तज्ज्ञाने दिला इशारा दिवाळीपर्यंत सोनं 70 हजार जाण्याची शक्यता तज्ज्ञांच्या मते, दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव रेकॉर्ड ब्रेक असतील. जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार आर्थिक, महामारी आणि राजकिय परिस्थिती पाहता दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 70 हाजर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस आली तरी सोन्याचे भाव सुधारण्यास जास्त कालावधी लागेल. वाचा- ऑगस्ट महिन्यात सोनेचांदी 8000 पेक्षा जास्त दराने झाले स्वस्त, आणखी उतरणार भाव ऑगस्टमध्ये किती उतरले सोन्याचे दर? ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोन्याचे भाव 2302 रुपये प्रति तोळा तर चांदी 10243 रुपये प्रति किलोने महागा झाली होती. याचे महत्त्वाचे कारण कोरोनाचे वाढते संक्रमण आणि शेअर बाजारातील अनिश्चितता हे होते. 3 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 53976 रुपये प्रति तोळाच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सोने सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. यादिवशी सोन्याचे दर 56126 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. चांदीचे दर यादरम्यान 64770 रुपये प्रति किलोवरून 75013 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.