JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याचे भाव वधारले की कमी झाले? इथे तपासा लेटेस्ट किमती

Gold Price Today: सोन्याचे भाव वधारले की कमी झाले? इथे तपासा लेटेस्ट किमती

सोन्या-चांदीच्या दरात (Gold Rate Today) सध्या चढ-उतार सुरूच आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी वाढला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: सोन्या-चांदीच्या दरात (Gold Rate Today) सध्या चढ-उतार सुरूच आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव (Silver Rate Today) 0.32 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. दिवाळीत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी आणखी वाढत आहे, परिणामी सोन्याच्या किंमतीना आधार मिळतो आहे. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे. जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.24 टक्क्यांनी वाढून 47,551 रुपये प्रति तोळा झाला आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.32 टक्क्यांनी वधारली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 62,836 रुपये आहे. हे वाचा- मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटमध्ये कपात मिस्ड कॉल देऊन जाणून घ्याल सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा- स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या