नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती उतरल्या असल्या तरी देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव (Gold Price Today) वाढले आहेत. अमेरिेकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. शुक्रवारी सोन्याचे दर प्रति तोळा 730 रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे आज चांदीच्या किंमतीमध्ये (Silver Price Today) 1520 रुपयांची जोरदार उसळी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते परदेशी बाजारामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये 7 वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाल्यानंतर थोड्या रिकव्हरीची अपेक्षा आहे. मात्र पुढच्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीवर पुन्हा एकदा दबाव वाढू शकतो. सोन्याचे नवे दर (Gold Price on 14 August 2020) शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारामध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याचे दर 52,961 रुपये प्रति तोळावरून वाढून 53,691 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. यावेळी सोन्याच्या किंमतीमध्ये 730 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 52,956 रुपये प्रति तोळा आहे. चांदीचे नवे दर (Silver Price on 14 August 2020) सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमती देखील वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये एक किलो चांदीची किंमत 68,980 रुपयांवरून 70,500 रुपये प्रति किलो झाली आहे. आज चांदीच्या किंमती 1520 रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. तर मुंबईमध्ये चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. मुंबईमध्ये चांदीचे भाव 68676 रुपये प्रति किलो आहेत. (हे वाचा- कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाला या पदार्थाचा खप, तुम्ही देखील करू शकता व्यवसाय ) तज्ज्ञांच्या मते या आठवड्याच्या सुरुवातील फ्यूचर गोल्ड 56,000 रुपये प्रति तोळाच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. बुधवारी त्यामध्ये घसरण होत भाव 50 हजारांवर आले होते. त्याचप्रमाणे सिल्व्हर फ्यूचर आठवड्याच्या सुरुवातील 78,000 रुपये प्रति किलो होते, आता तब्बल 22 टक्क्यांनी या किंमती घसरून प्रति तोळा 61 हजार रुपयांवर आल्या आहेत.