JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; काय आहेत नवे दर?

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; काय आहेत नवे दर?

गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,328 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 65,802 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) आज सोन्याच्या दरात घट झाली असली तरी चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर : दिवाळीनंतर लग्नसोहळ्यांना सुरुवात होते. या लग्नाच्या हंगामात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्यासाठी आजचा दिवस दिलासादायक आहे. कारण आज म्हणजेच 15 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत (Gold Rate Today) घट झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही (Silver Rate Today) घसरण झाली आहे. घसरणीनंतर आज चांदीचा भाव 65 हजार रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,328 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 65,802 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) आज सोन्याच्या दरात घट झाली असली तरी चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचा भाव सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 82 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवली गेली. त्यामुळे 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 48,246 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती झपाट्याने कमी झाल्या आणि तो 1,862 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या. ICICI Securitiesची ‘या’ मेटल स्टॉकला BUY रेटिंग, वर्षभरात 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न चांदीच्या दरामध्येही घसरण आज चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा भाव 208 रुपयांनी घसरून 65,594 रुपये प्रति किलो झाला. तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 25.18 डॉलर प्रति औंसवर कायम आहे. वर्षभरात ‘हा’ शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का? सोन्याच्या दरात घट होण्याचं कारण HDFC Securities चे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, आज कॉमेक्सवर (Comex) स्पॉट सोन्याच्या किमतीत (Spot Gold Price) घट झाली आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपयात वाढ होऊनही सोन्याचा दर 5 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या