JOIN US
मराठी बातम्या / मनी / स्वस्त सोनं खरेदी करायचा आजचा शेवटचा दिवस, 'इथे' मिळतेय सवलत

स्वस्त सोनं खरेदी करायचा आजचा शेवटचा दिवस, 'इथे' मिळतेय सवलत

Gold Bond - तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करायची चांगली संधी आलीय

जाहिरात

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,425.40 डॉलर प्रति औंस झालंय तर चांदी 16.58 डॉलर प्रति औंस झालीय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर : गेले 2 महिने सोनं सतत महाग होतंय. म्हणून तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन पुढे ढकलला असेल. पण आता तुमची चिंता मिटली. तुम्ही ऑनलाइन सोनं खरेदी करू शकता. त्यातही तुम्हाला 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळेल. पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB नं आपल्या ग्राहकांसाठी साॅवरेन गोल्ड बाॅण्ड स्कीम आणलीय. 2019-20च्या सीरिज 4 मध्ये गुंतवणुकीची संधी मिळतेय. तुम्ही या साॅवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये कमीत कमी 1 ग्रॅम सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला 3,890 रुपये खर्च करावे लागतील. यात तुम्ही 1 किलोग्रॅमपासून 4 किलोग्रॅमपर्यंत सोन्याची गुंतवणूक करू शकता. भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमजोर - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पीएनबीच्या या साॅवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे आजचाच दिवस आहे. यात तुम्ही 13 सप्टेंबर 2019पर्यंत गुंतवणूक करू शकता. PNB च्या या गोल्ड बाॅण्ड स्कीमची खासीयत म्हणजे यात तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक केलीत तर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात ‘असे’ मिळतील पैसे काय आहे साॅवरेन गोल्ड बाॅण्ड? साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात 2015मध्ये झाली होती. सोन्याचे दागिने खरेदी करणं कमी व्हावं आणि सोन्याच्या खरेदीचा उपयोग बचतीसाठी व्हावा म्हणून हा बाॅण्ड सुरू झाला. सोनं खरेदी करून घरात ठेवण्यापेक्षा बाॅण्ड घेतला तर करही वाचतो. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधल्या लवंगीबाईचं ‘हे’ गुपित तुम्हाला माहीत आहे का? ऑनलाइन पेमेंटवर मिळेल सूट अर्थमंत्रालयानं म्हटलंय की, ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट मिळते. 2.5 टक्के मिळेल व्याज स्कीममध्ये गुंतवणुकीवर 2.5 टक्के वर्षाला व्याज मिळेल. कॅपिटल गेन टॅक्सची होईल बचत यात गुंतवणुकीचा अवधी 8 वर्षांचा असतो. पण तुम्ही 5 वर्षांनंतर तुमचे पैसे काढू शकता. त्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. कर्ज मिळू शकतं गोल्ड बाॅण्ड पेपरवर कर्ज मिळू शकतं. हे पेपर्स पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग  सर्टिफिकेटप्रमाणे असतात. विसर्जनादरम्यान बोट उलटून 11 जणांचा मृत्यू; जीवघेण्या दुर्घटनेचा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या