JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price today: सोनेखरेदी आधी इथे तपासा लेटेस्ट भाव, आतापर्यंत 8800 रुपयांनी कमी झाले दर

Gold Price today: सोनेखरेदी आधी इथे तपासा लेटेस्ट भाव, आतापर्यंत 8800 रुपयांनी कमी झाले दर

Gold Price today: मंगळवारी सोन्याचांदीच्या (Gold and Silver Rates) किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळते आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर 198 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: मंगळवारी सोन्याचांदीच्या (Gold and Silver Rates) किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळाली. 16 फेब्रुवारी 2021 रोजी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याचे दर 198 रुपयांनी वधारले आहेत. या वाढीनंतर सोन्याचे भाव MCX वर 47439.00 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीच्या किंमतीतही आज तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 634 रुपयांच्या तेजीमुळे 70763.00 रुपये प्रति किलो वर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46400 रुपये प्रति तोळावर आहेत. ‘ऑल टाइम हाय’ स्तरावरून किती स्वस्त झालं सोनं? सोन्याच्या घसरणीबद्दल बोलायचं झालं तर, सोन्याचे भाव सर्वोच्च स्तरावरून अर्थात ऑल टाइम हाय स्तरावरुन जवळपास 8800 रुपयांनी स्वस्त झालं आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा स्तरावर पोहोचले होते. तर चांदीचे दर आतापर्यंत 7300 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारातील भाव दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 19 रुपयांनी घसरले होते, त्यानंतर दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,826 रुपये प्रति तोळावर पोहोचला होता. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर वधारले होत चांदीचा भाव 646 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढून 69,072 इतका झाला होता. (हे वाचा- पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर, या शहरात पेट्रोलचे दर शंभरी पार ) एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांत आलेल्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूच्या दरात घसरण झाली आहे. आज का झाली सोन्याच्या दरात वाढ? तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील उसळीमुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचांदीचे दर वधारले आहेत. अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजसंदर्भात वाढलेल्या अपेक्षा आणि डॉलरमध्ये कमजोरी कायम असल्यामुळे सोने उच्च स्तरावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या