नवी दिल्ली, 30 मे : देशभरात 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) काही व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत तर काही धीम्या गतीने सुरू आहेत. दरम्यान या काळात सोन्याच्या किंमतीनी काही रेकॉर्ड रचले आहे. शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 46819 रुपये प्रति तोळा इतक्या होत्या. त्यानंतर सोन्याचे भाव प्रति तोळा 46929 रुपयांवर येऊन पोहोचले होते. पूर्ण दिवसभरात सोन्याच्या किंमती 66 रुपयांनी कमी झाल्या होत्या. एकीकडे सोन्याचे दर काहीसे उतरले असताना चांदीच्या किंमतीमध्ये मात्र तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद होत असताना चांदीच्या किंमती 530 रुपयांनी वाढून 48435 रुपये प्रति किलो झाल्या होत्या. (हे वाचा- 1 जूनपासून बदलणार रेशन कार्ड संबंधित अनेक नियम, वाचा सविस्तर ) इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion and Jewellers Association IBJA) च्या वेबसाइटवर सोन्याचांदीच्या सरासरी किंमती अपडेट करण्यात येतात. शुक्रवारी 23 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये देखील 66 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर या शुद्धतेच्या सोन्याचे भाव प्रति तोळा 46741 रुपयांवर पोहोचले होते. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे या प्रकारच्या शुद्धतेच्या सोन्याची किंमत 42987 रुपये प्रति तोळा होती. (हे वाचा- ‘या’ 4 बँकांवर RBIने ठोठावला 5.45 कोटींचा दंड,नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई ) सोन्याची स्पॉट किंमत वाढल्यामुळे वायदे बाजारातही किंमतीत वाढ झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. वायदे बाजारात सोने 130 रुपयांनी महागले त्यामुळे याठिकाणी सोन्याच्या किंमती 46,535 रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर जून महिन्यासाठीच्या सोन्याची किंमत 130 रुपयांनी वाढून 46,535 रुपये प्रति तोळा झाली आहे.