JOIN US
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊन 3.0 मध्ये सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या मंगळवारचे भाव

लॉकडाऊन 3.0 मध्ये सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या मंगळवारचे भाव

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमती प्रति तोळा 170 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 मे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. मंगळवारी सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. सोन्याच्या किंमती प्रति तोळा 170 रुपयांनी कमी झाल्या आहेत**.** त्यामुळे सोन्याचे भाव प्रति तोळा 45,743 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये 180 रुपयांनी वाढ होत दर प्रति तोळा 45,913 रुपये झाला होता. चांदीच्या किंमतीमध्ये देखील घसरण सुरूच आहे. सोमवारी सुद्धा चांदी  900 रुपये प्रति किलोने कमी झाली होती. सोन्याचांदीचे दर कमी होण्याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीनंतर अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवहारात कपात केली आहे. परिणामी मंगळवारी वायदे बाजारात 0.88 टक्क्यांची घसरण झाल्याने सोन्याचे दर 45,405 प्रति तोळा आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर जूनच्या सोन्याच्या किंमती 402 रुपयांनी म्हणजेच 0.88 टक्क्यांनी कमी झाल्याने दर 45,405 प्रति तोळा आहे. (हे वाचा- लॉकडाऊनचा सोन्यावर मोठा परिणाम, एप्रिल महिन्यात 30 वर्षातील सर्वात कमी खरेदी ) ऑगस्ट महिन्यातील सोन्याची फ्यूचर किंमत 378 किंवा 0.82 टक्क्यांनी कमी होत 45,640 प्रति तोळा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये 0.75 टक्क्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. याठिकाणी सोन्याचे दर 1,700.40 डॉलर प्रति औंस राहिले आहेत. काय आहेत चांदीचे भाव? मंगळवारी चांदीच्या किंमतींमध्ये प्रति किलो 165 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीची किंमत प्रति किलो 41,079 रुपये आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर जुलै महिन्यासाठीच्या चांदीची किंमत 165 रुपयांनी किंवा 0.4 टक्क्यांनी कमी होत 41,079 रुपये प्रति किलो राहिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये 0.91 टक्क्याने चांदीचे दर वाढले आहेत. याठिकाणी चांदीचे दर 14.93 डॉलर प्रति औंस राहिले आहेत. एकंदरित आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सोने बाजारात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे परिणाम होत आहे. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या