JOIN US
मराठी बातम्या / मनी / सोन्याच्या किंमतींनी मोडले सर्व रेकॉर्ड, या कारणामुळे देशात आतापर्यंतचे सर्वात जास्त दर

सोन्याच्या किंमतींनी मोडले सर्व रेकॉर्ड, या कारणामुळे देशात आतापर्यंतचे सर्वात जास्त दर

कोरोनाच्या या संकटकाळात अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढल्यामुळे जगभरातील सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जुलै : कोरोनाच्या या संकटकाळात अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढल्यामुळे जगभरातील सोन्याच्या किंमती (Gold Price in International Markets) सर्वोच्च स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर देखील होत आहे. गुरुवारी देखील सोन्याच्या दरांनी नवीन रेकॉर्ड नोंदवला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीमध्ये 502 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान काल चांदीची झळाळी काहीशी उतरल्याचे पाहायला मिळाले.
सोन्याचे नवे दर
दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे भाव गुरुवारी प्रति तोळा 50,941 रुपयांवरून 51,443 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोन्याच्या किंमती 502 रुपयांनी वाढल्या आहेत. देशात सध्या असणाऱ्या सोन्याच्या किंमती या आजपर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गुरुवारी 1,875 डॉलर प्रति औंस होते.
(हे वाचा- जगभरातील टॉप 50 कंपनींमध्ये रिलायन्स समूह, मार्केट कॅप 13 लाख कोटींच्या पलीकडे )
मुंबंईमध्ये स्टँडर्ड सोन्याची किंमत (99.5 टक्के) वाढून 50,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंत 50,552 रुपये होती.
चांदीचे नवे दर
गुरुवारी चांदीचे दर काहीसे कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र तरीही 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 62 हजारांवर आहेत. दिल्लीमध्ये गुरुवारी चांदीचे दर 62,829 रुपये प्रति किलोवरुन कमी होऊन 62,760 रुपये प्रति किलो झाले आहेत. चांदी 69 रुपयांनी खाली उतरली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव गुरुवारी 222.76 डॉलर प्रति औंस होते. मुंबईमध्ये एक किलो चांदीचे दर 60,586 रुपये आहेत.
का महाग झाली सोन्याचांदीची खरेदी?
एचडीएफसी सिक्योरिटीचे कमोडिटी अनालिस्ट (HDFC Securities Senior Analyst (Commodities)तपन पटेल यांच्या मते, अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे.
(हे वाचा- RBI कर्ज घेऊन मोदी सरकारला किती दिवस उधार देणार? रघुराम राजन यांची टीका )
आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेचा परिणाम निश्चित आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान मौल्यवान धातूंची खरेदी ही आजही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या