JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today : सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

Gold Price Today : सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

सोने-चांदी दरात (Gold-Silver Rate) आज मंगळवारी 22 मार्च 2022 रोजी तेजी पाहायला मिळाली. सोन्यासह चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मार्च : सोने-चांदी दरात (Gold-Silver Rate) आज मंगळवारी 22 मार्च 2022 रोजी तेजी पाहायला मिळाली. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 165 रुपयांनी महाग (Gold Price Today) झालं आहे. या वाढीसह सोनं आज 51820.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. सोन्यासह चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 461 रुपयांनी (Silver price today) वधारला आहे. या तेजीनंतर आज चांदी 68810.00 प्रति किलग्रॅमवर ट्रेड करत आहे. बुलियन मार्केटमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 48354 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 52750 रुपये आहे. 20 कॅरेटचा 10 ग्रॅमसाठीचा भाव 43958 रुपये, तर 18 कॅरेटचा भाव 39563 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलोग्रॅम चांदीचा भाव 69600 रुपयांवर ट्रेड करत आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मौल्यवान धातू मोठ्या वाढीसह ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 1936.40 डॉलर प्रति औंस आहे. तर चांदी 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 25.32 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.

हे वाचा -  Gold Reserves: सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले टॉप 10 देश, भारत कितव्या स्थानी?

कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे वाचा -  केवळ 13,650 रुपयांत बना बाबा रामदेव यांचे बिजनेस पार्टनर, 24 मार्चपासून मिळेल संधी

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या