JOIN US
मराठी बातम्या / मनी / या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार

या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाची मोठी झळ, मार्च महिन्याचा पगार कापणार

GoAir च्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. गोएअरच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  25 मार्च : कोरोनामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय आणि  आंतरराज्यीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे याचा  मोठा फटका एअरलाइन्सला बसला आहे. एअरलाइन्सच्या उड्डाणावर मोठ्या प्रमाणात निर्बंध असल्याने नुकसान अगणित आहे. अशा परिस्थिती GoAir च्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. गोएअरच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. GoAirचे सीईओ विनय दुबे (CEO Vinay Dube)  यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे गोएअरच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार कापण्यात येणार आहे. (हे वाचा- कोरोनामुळे अमेरिकेत भीषण स्थिती,डॉक्टरांसाठी या भारतीय हॉटेलचा कौतुकास्पद निर्णय ) विनय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्याची परिस्थिती पाहता, मार्च महिन्यासाठी पगारात कपात करण्याचा निर्णय काही काळाकरता वाढवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही आहे. मात्र कमी पगार असणाऱ्यांना याची कमी प्रमाणात झळ बसेल, अशी हमी आम्ही देत आहोत.’ इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार दरम्यान बजेट एअरलाइन्स इंडिगोने (Indigo) आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द असल्याने काही कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, या काळात पगार कपात होणार नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता सरकारने मंगळवारी मध्यरात्री ते 31 मार्च दरम्यान देशांतर्गत उड्डाणे बंद केली आहेत. कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजय दत्ता म्हणाले की, कंपनीकडे एप्रिलसाठी आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग आहे. ते म्हणाले, ज्या या कर्मचार्‍यांना या कालावधीत सुट्टी दिली आहे, आम्ही त्यांच्या पगारामध्ये कपात करणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या