मुंबई, 18 जून : तुम्ही कुठे फिरण्याचा प्लॅन करताय? तेही विमानानं? मग तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑफर्स आहेत. गोएअर आणि विस्तारा या दोन विमान कंपन्यांनी डिस्काउंटची घोषणा केलीय. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांना बराच फायदा होऊ शकतो. ही ऑफर आजपासून ( 18 जून ) सुरू झालीय. तुम्ही 18 जून ते 23 जूनपर्यंत बुकिंग करू शकता. या दरम्यान तुम्ही तिकीट बुक करून 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रवास करू शकता. आर्थिक गुंतवणुकीत स्त्री पुरुषापेक्षा कशी असते वेगळी? GoAir च्या तिकिटाची सुरुवात 1769 रुपयांनी होतेय. त्याबरोबर GOAIR10 प्रोमो कोड अप्लाय करा. म्हणजे तुम्हाला 10 टक्के आणखी सूट मिळू शकते. तुम्हाला 10 टक्के सूट हवी असेल तर goair.in किंवा Go Air अॅपवरच बुकिंग करायला हवं. CNG कार्सवरचा GST होऊ शकतो कमी, कारण… Vistara च्या सेलचा फायदा हवा असेल तर तुमच्याकडे आहेत 48 तास . विस्ताराचा मान्सून सेल 48 तासांसाठी आहे. यात इकाॅनाॅमिक क्लासचं तिकीट 1299 रुपये, प्रीमियम इकाॅनाॅमी क्लास तिकीट 1999 रुपयांपासून सुरू होतंय. बिझनेस क्लासचं तिकीट तुम्हाला 4999 रुपयांना पडेल. Vistara च्या मान्सुन सेल तिकिटात तुम्हाला 3 जुलैपासून 26 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रवास करता येईल. राज्याच्या अर्थसंकल्पातल्या 10 मुख्य गोष्टी एकीकडे जेट एअरवेज कंपनी बंद पडलीय. तर अनेक विमान कंपन्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलती घेऊन आल्यात. मध्यंतरी विमान प्रवास महाग होतोय, अशाही चर्चा होत्या. पण या काही आॅफर्सनं प्रवाशांना दिलासा मिळालाय. स्पाइसजेट या विमान कंपनीनं मुंबई ते बँकाॅक रिटर्न ही सेवा सुरू केलीय. या विमानाचं तिकीट आहे फक्त 10095 रुपये. याशिवाय स्पाइसजेटनं मुंबई ते दुर्गापूर, मुंबई ते अमृतसर, मुंबई ते बागडोरा, मुंबई ते बंगळुरू, मुंबई ते डेहराडून, मुंबई ते गोहाटी, मुंबई ते मंगलोर आणि मुंबई ते मदुराई अशी नवी रिटर्न फ्लाइट्स सुरू केलीयत. तीही सर्व 5 हजार रुपयांच्या आत आहेत. VIDEO : ओवेसींचा ‘जय श्रीराम’च्या घोषणांना ‘जयभीम’ने उत्तर