JOIN US
मराठी बातम्या / मनी / येत्या 10 दिवसांत करून घ्या 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल 10 हजारांचा दंड

येत्या 10 दिवसांत करून घ्या 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल 10 हजारांचा दंड

आर्थिक वर्ष 31 मार्चला संपणार आहेय. त्यामुळे काही महत्त्वाची काम 1 एप्रिलच्या आधीच करून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : कोरोना व्हायरसमुळे फक्त भारतातच नाही तर जगभरात हाहाकार पसरला आहे. 8 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना जगभरात कोरोनाची बाधा झाली आहे. भारतात आतापर्यंत 250 लोकांना तर महाराष्ट्रात 52 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे सगळेच सर्वच चिंतेत आहेत. आर्थिक वर्ष 31 मार्चला संपणार आहेय. त्यामुळे काही महत्त्वाची काम 1 एप्रिलच्या आधीच करून घ्या. अन्यथा खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. बँकेसोबतच काही महत्त्वाची कामं आहेत ती 31 मार्चच्या आधी पूर्ण केली नाहीत दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक करा पॅन आणि आधार लिंक कऱण्यासाठी 31 मार्च अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या कालावधीमध्ये लिंक न केल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पीएम आवास योजनेचा कालावधी होणार समाप्त प्रधानमंत्री आवास योजना क्रेडिट सब्सिडी योजनेचा 31 मार्चपर्यंत लाभ घेता येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आरबीआयने बँकेत न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. त्यामुळे अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. 31 मार्चनंतर ही योजना बंद होणार आहे. हे वाचा- कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका विविद से विश्वास स्कीम या योजनेंतर्गत टॅक्स भरणाऱ्या करदात्यांना पेनल्टी कमी करण्यात येणार आहे. बिलेटेड टॅक्स रिटर्न फायलिंग 31 मार्च उशीरा रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आहे. उशिरा आयकर भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2018-19 कर भरण्याची अंतिम मुदत 01 जुलै 2019 होती, जी नंतर एका महिन्यासाठी वाढविण्यात आली. जर आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर उशीरा रिटर्न भरण्यासाठी फी 1000 रुपयांपर्यंत माफ करण्यात आली होती. जर आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर 31 मार्च पर्यंत हे दंड 10,000 रुपयांपर्यंत भरावा लागणार आहे. ITR फाईल आपल्या आयटीआरमध्ये काही चूक किंवा फरक असल्यास, सुधारित रिटर्न भरण्याची ही शेवटची तारीख देखील आहे. आपण पुढील आर्थिक वर्षात आयटीआर न दाखल केल्यास समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, या मुदतीच्या आत आपले उशीर झालेला किंवा सुधारित रिटर्न दाखल करायचा असेल तर 31 मार्चपर्यंत करून घ्या. हे वाचा- बँकेतील काम लवकरात लवकर उरका, कोरोनामुळे कामकाजाची वेळ घटवण्याची शक्यता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या