मुंबई, 17 जून : पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणं अनिवार्य आहे. त्याची डेडलाइन 30 सप्टेंबर 2019 आहे. पण इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांसाठी मात्र 31 जुलै 2019च्या आधी पॅन आणि आधार लिंक करायला हवं. तसं नाही केलं तर रिटर्न फाइल करता येणार नाही. म्हणजे 31 जुलैच्या आधी तुम्हाला हे काम करायलाच लागेल. IT रिटर्न भरण्यासाठी गरजेचं आहे आधार CBDTनं स्पष्ट सांगितलं की 1 एप्रिल 2019 ला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार नंबराचा उल्लेख गरजेचा आहे. सुप्रीम कोर्टानं गेल्या सप्टेंबरमध्ये आधार कार्डाला वैध ठरवलं होतं. कोर्टानं सांगितलं होतं, PANच्या वेळी आणि रिटर्न भरताना आधार कार्डाचा उल्लेख आवश्यक आहे. कर्जबाजारी न होता संपत्ती वाढवायची असेल तर वापरा हा फॉर्म्युला असं करा पॅन आणि आधार लिंक तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणी केली नाही, तर तुमचं पॅन कार्ड रद्द केला जाऊ शकतं. त्यामुळे पॅन कार्ड रद्द होऊ नये, असं वाटत असल्यास पॅन-आधार कार्डची जोडणी दिलेल्या कालावधीत न विसरता करून घ्या. सावधान, मोदी सरकारनं लागू केले इन्कम टॅक्सचे नवे कडक नियम पॅन-आधार जोडणी न केल्यास आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत तुमचं पॅन कार्ड अवैध मानलं जाईल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पॅन-आधार जोडणी न झाल्यास तुम्ही ऑनलाइन आयकर परतावा (ITR)भरू शकत नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. सोबत पॅन कार्डदेखील अवैध मानलं जाईल. लॉ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा info.mahacet.org या वेबसाईटवर तुमचे अकाउंट जर उघडलेलं नसेल तर सर्वात आधी ते रजिस्टर करून घ्या. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.(www.incometaxindiaefiling.gov.in) वेबसाइटवर ‘लिंक आधार’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करून आपल्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला ‘आधार कार्ड लिंक’ पर्याय दिसेल, हा पर्याय निवडावा. आपल्या आधार कार्डवरील क्रमांक आणि कोड भरावा. आवश्यक ती माहिती वेबसाइटवर भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. याद्वारे तुमचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडला जाईल. SMS नं करा लिंक फोनवरूनही तुम्ही पॅन आणि आधार लिंक करू शकता. त्यासाठी UIDPN असं लिहून आधार आणि पॅनचा नंबर लिहा. UIDPAN space 12आकडी Aadhaar space 10आकडी PAN असं लिहून 567678 किंवा 56161 वर SMS करा. VIDEO : जागा तुम्ही निवडा, उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज