JOIN US
मराठी बातम्या / मनी / CIBIL Score वाढवण्यासाठी 'हे' नियम पाळा, कर्ज मिळवण्यासाठी कधीच अडचण येणार नाही

CIBIL Score वाढवण्यासाठी 'हे' नियम पाळा, कर्ज मिळवण्यासाठी कधीच अडचण येणार नाही

खराब CIBIL स्कोर पाहून, बँका कर्ज देण्यास किंवा व्याजदर कमी करण्यास नकार देतात. CIBIL स्कोअर उत्कृष्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला 5 खात्रीपूर्वक मार्ग सांगत आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : जेव्हापासून बँकांनी कर्ज वितरणासाठी सिबिल स्कोर (CIBIL score)पाहण्यास सुरुवात केली आहे ग्राहकांना कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांचा सिबिल स्कोअर बँकांसाठी इतका महत्त्वाचा का झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. CIBIL स्कोर हा नंबर किंवा रेटिंग आहे जे सांगते की तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यात किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात किती गंभीर आहात. तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल किंवा इतर कर्ज वेळेवर भरले नाही, तर तुमच्या CIBIL स्कोअरवर थेट परिणाम होतो. खराब CIBIL स्कोर पाहून, बँका कर्ज देण्यास किंवा व्याजदर कमी करण्यास नकार देतात. CIBIL स्कोअर उत्कृष्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला 5 खात्रीपूर्वक मार्ग सांगत आहोत. क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा कंपन्या तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर जास्तीत जास्त लक्ष देतात. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या क्रेडिट लिमिटपैकी किती रक्कम वापरली जाते. 30 टक्क्यांपर्यंत गुणोत्तर राखणाऱ्याला कंपन्या चांगले मानतात. जर तुम्ही 50 टक्के किंवा त्याहून अधिक वापरत असाल, तर तुम्ही तुमचे खर्च भागवण्यासाठी कर्जावर अवलंबून आहात हे दाखवते. EPFO : 50 लाख सदस्यांनी केले E-Nomination; मिळतात अनेक फायदे, तुम्ही केलं का? वेळेवर आणि पूर्ण पैसे देण्याची सवय लावा तुमचा फोन, पाणी, वीज, क्रेडिट कार्ड बिल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे देणे वेळेवर भरण्याची सवय लावा. तसेच, पूर्ण पेमेंट करण्याचा प्रयत्न करा, कारण किमान रक्कम (minimum Ammount) भरल्यास तुमची तात्पुरतं त्यातून मुक्त व्हाल. परंतु भविष्यात ते तुमचे कर्ज केवळ महागच करणार नाही तर CIBIL स्कोअर देखील खराब करू शकते. संयुक्त खात्यावरही नजर ठेवा जर तुमचे संयुक्त खाते असेल तर त्यावरही लक्ष ठेवा. तुमच्या सह-खातेधारकांनी वेळेवर कोणतीही थकबाकी भरली नाही आणि तुम्ही डिफॉल्ट कराल. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर देखील खराब होऊ शकतो. Investment Tips : येत्या काही महिन्यात चांदी 80 हजारांवर जाण्याची शक्यता, तज्ज्ञ काय सांगतात वर्षातून तीनदा क्रेडिट हिस्ट्रीचे पुनरावलोकन करा तुम्ही तुमच्या CIBIL अहवालावर सतत लक्ष ठेवावे आणि दर 4 महिन्यांनी त्याचे पुनरावलोकन करावे. क्रेडिट हिस्ट्री पाहून, तुम्हाला कळेल की सर्व पेमेंट रेकॉर्ड समान रीतीने राखले जात आहेत. जर तुम्ही कोणतेही खाते किंवा कार्ड बंद केले असेल तर ते देखील तपासा. एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका जर तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर एकाच वेळी अनेक ठिकाणी अर्ज करू नका. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. यामुळे कंपन्यांना असे वाटते की तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिरतेबद्दल शंका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या