JOIN US
मराठी बातम्या / मनी / फ्लाइटमध्ये जे पेट्रोल टाकलं जातं ते किती रुपये लिटर असतं? विमानाचं मायलेज किती?

फ्लाइटमध्ये जे पेट्रोल टाकलं जातं ते किती रुपये लिटर असतं? विमानाचं मायलेज किती?

तुम्हाला बाईक-कारच्या पेट्रोलबद्दल बरेच काही माहित असेल, परंतु आज आपण फ्लाइटच्या पेट्रोलबद्दल जाणून घेऊया. हे पेट्रोल किती रुपये लीटर येतं आणि फ्लाइटचं मायलेज किती असतं.

जाहिरात

फ्लाइटला पेट्रोल किती लागतं?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल: तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल तर तुम्ही त्यांच्या मायलेजची विशेष काळजी घेत असाल. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरही लक्ष ठेवत असाल. पण, फ्लाइटचा मायलेज किती आहे आणि त्यात टाकलेल्या इंधनाची किंमत काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नसेल तर तुम्हाला फ्लाइट इंधनाशी संबंधित प्रत्येक माहिती मिळणार आहे. पण फ्लाइटमध्ये कोणते इंधन टाकले जाते? आणि ते किती रुपये लिटर भेटतं? याविषयीच सविस्तर आपण जाणून घेऊया.

फ्लाइटमध्ये कोणतं इंधन टाकतात?

विमान किंवा हेलिकॉप्टरसारख्या कोणत्याही जेटसाठी विशेष जेट फ्यूल असतं. तसे, या जेट फ्यूल एव्हिएशन केरोसीन म्हणतात आणि ते QAV म्हणून देखील ओळखले जाते. जेट इंधन हे वेगळं नसतं आणि ते ज्वलनशील देखील असतं आणि ते पेट्रोलियमपासून मिळणारे डिस्टिलेट लिक्विड असते. हे केरोसिनवर आधारित फ्यूल आहे. हे कॉमर्शियल एयर ट्रांसपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

ATM मध्ये का लावलेले असतात दोन AC? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल

एव्हिएशन केरोसीनची किंमत किती?

जर आपण एव्हिएशन केरोसिनच्या दराबद्दल बोललो तर इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, देशांतर्गत एअरलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय रनसाठी एटीएफची किंमत वेगळी आहे. दिल्लीत ATF ची किंमत 1,07,750 रुपये प्रति किलोलिटर आहे. म्हणजे एका लिटरची किंमत सुमारे 107 रुपये आहे. एका किलोलिटरमध्ये 1000 लिटर तेल असते. अशाप्रकारे मुंबईत त्याचा दर 1,06,695 रुपये, कोलकात्यात 115091 रुपये आहे. हा दर 1 मार्च 2023 नुसार आहे. म्हणजेच सामान्य पेट्रोल आणि विमानाच्या रॉकेलच्या दरात फारसा फरक नाही.

AC मुळे येणारं विज बील कमी करायचंय? फॉलो करा ही ट्रिक, 36 टक्के कमी येईल बील

संबंधित बातम्या

फ्लाइट मायलेज म्हणजे काय?

आता पाहूया की, एक लिटर पेट्रोलमध्ये फ्लाइट किती दूर जाऊ शकते. तसंच विमानाचं मायलेज किलोमीटरनुसार ठरवलं जात की वेळेनुसार? तर फ्लाइटचे मायलेज बाइकच्या मायलेजप्रमाणे मोजले जात नाही. रिपोर्ट्सनुसार, फ्लाइटचा ग्राउंड स्पीड 900 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 250 मीटर प्रति सेकंद आहे. तर एका तासात फ्लाइट 2400 लिटर पेट्रोल खर्च आणि विमान 900 किलोमीटरपर्यंत उडते. अशा वेळी, प्रत्येक किलोमीटरसाठी 2.6 लिटर पेट्रोल आणि प्रत्येक 384 मीटरसाठी एक लिटर पेट्रोल लागतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या