मुंबई, 13 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) गेल्या आठवड्यात रेपो दरात आणखी 50 बेसिस पाँईंट्सची वाढ केली. 50 बेसिस पॉइंट्स म्हणजे 0.50 टक्के ही वाढ आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी दरवाढ आहे आणि बाजारातील तज्ज्ञांनी भाकीत केले आहे की दर आणखी वाढतील. वाढत्या व्याजदरामुळे लोकांचे लक्ष पुन्हा निश्चित दराच्या गृहकर्जाकडे (Fixed Rate Home Loan) वेधले गेले आहे. कारण रेपो दरात वाढ झाल्यामुळे गृहकर्जही महाग होत आहे. फिक्स्ड रेट कर्जामध्ये सुरुवातीस निश्चित केलेला EMI कर्ज पूर्ण होईपर्यंत चालू राहतो. तर फ्लोटिंग रेट कर्जे वेळोवेळी आर्थिक घटकांच्या आधारे सुधारित केली जातात. फिक्स्ड रेटचा फायदा काय आहे? फिक्स्ड ईएमआयमध्ये, कर्जदाराला माहित असते की तो कर्जाच्या कालावधी आणि ईएमआयद्वारे किती रक्कम भरणार आहे. याशिवाय दरात वाढ झाली तरी कर्जदाराच्या मासिक बजेटवर त्याचा परिणाम होत नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, त्याचे फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. HDFC बँकेकडून ग्राहकांना अलर्ट! एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं, काय काळजी घ्याल? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फिक्स्ड रेट लोनचा व्याजदर हा फ्लोटिंग रेट लोनपेक्षा जास्त असतो. MyMoneyMantra.com चे व्यवस्थापकीय संचालक राज खोसला म्हणाले की, फिक्स्ड व्याजदर योजनांचा तोटा म्हणजे त्यांना प्री-पेमेंट दंड आकारला जातो आणि ते अधिक महाग असतात. फिक्स्ड रेट कर्जावरील व्याज फ्लोटिंग रेट कर्जापेक्षा 300-350 bps जास्त असू शकते. शिवाय, गेल्या 40-48 महिन्यांत झालेल्या व्याजदरात झालेल्या घसरणीचा फिक्स्ड रेट कर्ज घेणाऱ्यांनाही फायदा होत नाही. कर्ज घेणाऱ्यांनी काय करावे? तज्ज्ञांच्या मते, कर्जदारांनी सेमी-फिक्स्ड व्याजदराचा लाभ घ्यावा. राज खोसला म्हणतात, ग्राहक पहिल्या दोन वर्षांसाठी फिक्स्ड व्याजदर निवडू शकतात, ज्या दरम्यान त्यांना व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा असते. त्यानंतर ते फ्लोटिंग रेटवर जाऊ शकतात. जर फ्लोटिंग रेट लोन असलेले कर्जदार फिक्स्ड रेटवर स्विच करण्याची योजना करत असतील, तर त्यांना दिलेला फिक्स दर त्यांच्या सध्याच्या फ्लोटिंग रेटपेक्षा 200 bps पेक्षा जास्त नसेल तरच त्यांनी तसे केले पाहिजे. रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा आणखी एक तज्ज्ञ अमित सुरी म्हणतात की कर्जदाराकडे कर्जाची मुदत पूर्ण होण्यासाठी 2-3 वर्षे शिल्लक असतील आणि त्याला त्याच्या सध्याच्या फ्लोटिंग दरापेक्षा 100-150 bps अधिक फिक्स्ड दर मिळत असेल, तर त्यांनी स्विच करावे. ते म्हणतात की पुढील काही दिवसांत व्याजदर 150 bps पेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे.