JOIN US
मराठी बातम्या / मनी / बँकेकडून मिळतात 5 प्रकारचे होन लोन, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर!

बँकेकडून मिळतात 5 प्रकारचे होन लोन, जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर!

बँकेकडून पाच प्रकारचे होम लोन उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार होम लोन घेऊ शकतात.

जाहिरात

किती प्रकारचं असतं होम लोन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मार्च: आपलं स्वतःचं घर असावं असं आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक वेळा लोक घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या होम लोनची माहिती असेल तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कारण तुम्ही तुमच्या गरजेनुसार होम लोन घेऊ शकता आणि चांगली बचत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया 5 प्रकारचे गृहकर्ज आणि त्यांचे फायदे.

घरबांधणीसाठी होम लोन

तुम्हाला तुमचं घर बांधायचे असेल तर तुम्ही होम परचेस लोन घेऊ शकता. यामध्ये प्लॉटची किंमत तसेच घर बांधण्याची किंमत समाविष्ट असू शकते. प्लॉट खरेदी केल्यापासून एक वर्षाच्या आत कर्ज घेतले तरच त्याची किंमत समाविष्ट केली जाते.

IRCTC चं स्वस्त तिकीट खरेदी करायचंय? फॉलो करा ‘ही’ ट्रिक, मिळेल 5% सूट!

घर खरेदीसाठी होम लोन

नवीन फ्लॅट किंवा घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जालाही होम परचेस लोन म्हणतात. जर तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर तुम्हाला बँकेकडून 90% पर्यंत कर्ज मिळू शकते.बँका सहजपणे 80% पर्यंत कर्ज देतात. कर्जाचा कालावधी 20 ते 30 वर्षांपर्यंत असू शकतो.

घर मोठे करण्यासाठी होम लोन

जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या सध्याच्या घराचा आकार वाढवायचा असेल तर तो यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. या कर्जाला होम एक्सटेंशन लोन म्हणतात.

‘या’ ट्रिक्स फॉलो करुन ऑनलाइन काढता येईल पासपोर्ट, फॉलो करा सिंपल प्रोसेस

संबंधित बातम्या

घराच्या दुरुस्तीसाठी होम लोन

जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या सध्याच्या घराची दुरुस्ती, पेंटिंग किंवा नूतनीकरण करायचे असेल तर तो यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. यासाठी बँका होम इम्प्रूवमेंट लोन देतात.

ब्रिज होम लोन

हे होम लोन अशा वेळेसाठी दिले जाते, जोपर्यंत मालक नवीन मालमत्ता विकत घेतल्यानंतर सध्याची मालमत्ता विकत नाही. हे होम लोन विद्यमान मालमत्तेच्या विक्रीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे निर्माण होणारी निधीची तफावत भरून काढण्यात मदत करते. ब्रिज लोन साधारणपणे अल्प कालावधीसाठी असतात. बँका हे कर्ज जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी देतात.

एका व्यक्तीला दोन होम लोन मिळू शकतात का?

जेव्हा तुम्ही मजबूत क्रेडिट स्कोअर आणि चांगली परतफेड क्षमता असलेल्या व्यक्तीसोबत जॉइंट होम लोन घेता तेव्हा कर्ज मिळणे सोपं होतं. याशिवाय, तुम्ही जॉइंट होम लोन घेऊन अधिक कर्ज मिळवू शकता, कारण बँक दोन्ही अर्जदारांचे उत्पन्न लक्षात घेऊन कर्ज देईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या