JOIN US
मराठी बातम्या / मनी / महागाईतही सोनं, वाहन, प्रॉपर्टी खरेदी वाढण्याचा अंदाज; 'या' गोष्टींचा सकारात्मक परिणाम

महागाईतही सोनं, वाहन, प्रॉपर्टी खरेदी वाढण्याचा अंदाज; 'या' गोष्टींचा सकारात्मक परिणाम

सणासुदीच्या काळात सोनं, गाडी, प्रॉपर्टी खरेदीचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे या वर्षी याची मागील वर्षीच्या तुलनेत मोठी खरेदी होण्याचा अंदाज आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष सणांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याने सण देखील मोठ्या आनंदाज साजरे होतील यात शंका नाही. याशिवाय यावर्षी पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीत उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असल्याने या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात सोनं, गाडी, प्रॉपर्टी खरेदीचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे या वर्षी याची मागील वर्षीच्या तुलनेत मोठी खरेदी होण्याचा अंदाज आहे. दिव्य मराठीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सोन्याच्या खरेदीत यंदा 50 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांना आहे. जून महिन्यात 34 टक्के सोन्याची आयात वाढली आहे. याशिवाय सोन्याचे दर देखील त्याच्या उच्चांक किमतीपेक्षा अद्याप कमीच आहेत. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत सणासुदीच्या काळात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे प्रवासात पाच वर्षांखालील मुलांनाही फुल तिकीट काढावं लागणार? रेल्वे मंत्रालयाने म्हटलं…

संबंधित बातम्या

घरांची विक्री वाढण्याचा अंदाज एकीकडे होम लोनच्या व्याजदरात वाढ होत असताना देखील प्रॉपर्टी खरेदी वाढणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्या सहा महिन्यात घरांच्या विक्रीत 60 टक्के वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात घरांची विक्री आणखी वाढू शकते, असं तज्ज्ञांना वाटत आहे. Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा वाहन विक्रीही वाढणार? वाहन विक्रीही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जुलै महिन्यात वाहन विक्रीत 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपन्यांनी देखील आपलं उत्पादन वाढवलं असून नवनवीन गाड्या लाँच करुन ग्राहकांना आकर्षित केलं जात आहे. एकीकडे महागाईने नागरिक त्रस्त आहेत. मात्र तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सणासुदीच्या काळातील नागरिकांचा उत्साह महागाईवर मात करुन बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढवेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या