JOIN US
मराठी बातम्या / मनी / Home Loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतरही ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर याला अडचणीत

Home Loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतरही ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर याला अडचणीत

Home Loan Tips: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर घराची मूळ कागदपत्रे, नो ड्यू सर्टिफिकेट नीट तपासून पाहा आणि तुमच्याकडे सुरक्षित ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

जाहिरात

Home Loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतरही ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर याला अडचणीत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर: तुम्ही नवीन घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतलं असेल, तर त्याचा EMI तुमच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम करतो. म्हणूनच गृहकर्ज लवकरात लवकर संपावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्ही भविष्यासाठी अतिरिक्त पैसे वाचवण्यास सुरुवात करु शकता आणि तुम्ही खऱ्या अर्थानं  समाधानी होता की आता तुमचं घर खरोखरच तुमचं आहे आणि त्याच्यावर फक्त तुमचा मालकी हक्क आहे. गृहकर्ज फेडल्‍यानंतर घर तुमच्‍या मालकीचं असतं आणि हा  हा खरोखरच आनंदाचा क्षण असतो. पण या आनंदाच्या क्षणांमध्ये तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला पुढे येणारा त्रास टाळता येईल. गृहकर्जाची परतफेड झाल्यानंतर, तुम्ही ते न विसरता महत्त्वाची काही कामं केली पाहिजेत. मालमत्तेची मूळ कागदपत्रे घ्यावीत: जेव्हा तुम्ही तुमच्या नवीन घरासाठी गृहकर्ज घेता तेव्हा तुम्हाला घराची कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. म्हणजेच तुमचं घर तारण किंवा गहाण असतं. कर्जाची परतफेड करताना बँकेतून घराची मूळ कागदपत्रे घ्यायला विसरू नका. लक्षात ठेवा की यातील सर्व कागदपत्रे नीट आहेत का? त्यातील एखादं कागदपत्र गहाळ तर झालं नाही ना? याची खात्री करा. हेही वाचा:  Gold Jewellery Insurance: चिंताच मिटली! आता स्वत:च्या घरातच सुरक्षित ठेवा दागिने, बँक लॉकरची नाही गरज नो-ड्यू सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका: हे प्रमाणपत्र या गोष्टीचा पुरावा असते की, तुम्ही यापुढे बँकेला जबाबदार राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या कर्जाची पूर्ण परतफेड केली आहे. यासोबतच तुमच्या मालमत्तेवर बँकेचा कोणताही क्लेम नाही, असंही त्यावर लिहिलेलं असतं. हे कागदपत्र नीट तपासा आणि तुमचे नाव, पत्ता आणि इतर महत्त्वाचा तपशील नीट लिहिला आहे की नाही हेदेखील पहा. प्रॉपर्टीवर लीन (lien) हटवा: गृहकर्जाची परतफेड होईपर्यंत दुसऱ्याची मालमत्ता आपल्याकडे ठेवण्याच्या अधिकाराला धारणाधिकार म्हणतात. अनेक करदाते मालमत्तेवर धारणाधिकार (लीन-Lean) आकारतात. म्हणून कर्जाची परतफेड केल्यानंतर ते तुमच्या मालमत्तेतून काढून टाकण्याचे लक्षात ठेवा. एकदा का लीन काढून टाकला की, तुम्ही तुमची संपत्ती कोणत्याही अडचणीशिवाय दुसऱ्याला विकू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या