JOIN US
मराठी बातम्या / मनी / Big Breaking : EPFO ​व्याजदरात मोठा बदल, सरकारने वाढवलं इतकं व्याजदर

Big Breaking : EPFO ​व्याजदरात मोठा बदल, सरकारने वाढवलं इतकं व्याजदर

Employment Provident Fund Organization interest rate increased : आता 22-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : नोकरदार वर्गासाठी ज्यांचं EPFO मध्ये खातं आहे अशा सर्वांसाठी एक मोठी बातमी आहे. EPFO ने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. EPFO ने ही आनंदाची बातमी दिली आहे. ज्यांचं EPFO खातं आहे त्या सगळ्या ग्राहकांना FY- २२-२३ साठी 8.15 टक्के व्याजदर मिळणार आहे. याआधी सरकारने 2021-22.0 या आर्थिक वर्षासाठी 8.1% EPF व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता 22-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा ‘या’ अटी

मार्च 2022 मध्ये, EPFO ने 2021-22 साठी EPF वरील व्याज 2020-21 मध्ये 8.5 टक्क्यांवरून त्याच्या सुमारे पाच कोटी सदस्यांसाठी 8.1 टक्क्यांवर आणलं होतं. हा दर सर्वात निच्चांकी होता.1977-78 नंतरचा सर्वात कमी होता, जेव्हा EPF व्याजदर 8 टक्के होता. 2020-21 साठी EPF ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर CBT ने मार्च 2021 मध्ये ठरवला होता.

नोकरी बदलल्याने अनेक EPF अकाउंट झालेय? लगेच करा मर्ज, अन्यथा…

संबंधित बातम्या

“कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ने मंगळवारी झालेल्या बैठकीत 2022-23 साठी EPF वर 8.15 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या