JOIN US
मराठी बातम्या / मनी / 6 कोटी नोकरदारांना मोठा झटका! EPFOने PFच्या व्याजदरात केली कपात

6 कोटी नोकरदारांना मोठा झटका! EPFOने PFच्या व्याजदरात केली कपात

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तुमच्या प्रॉव्हिडेंट फंडवर (पीएफ) देण्यात येणाऱ्या व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,5 मार्च: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तुमच्या प्रॉव्हिडेंट फंडवर (पीएफ) देण्यात येणाऱ्या व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात 0.15 टक्क्याने कपात केली आहे. आता 8.50 टक्के व्याज मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) 6 कोटी खातेदारांना याचा फटका बसणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत हा निर्णय घेतण्यात आला. केंद्रीय विश्वस्त मंडळ पीएफवरील व्याजदराबाबत निर्णय घेते. या निर्णयानंतर अर्थ मंत्रालयाकडून त्याला मंजुरी देण्यात येते. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या खातेदारांच्या मूळ वेतनाच्या (मूळ वेतन+महागाई भत्ता) 12 टक्के रक्कम PFमध्ये जमा करण्यात येते. एवढीच रक्कम कंपनी देखील जमा करत असते. परंतु कंपनीच्या 12 टक्के योगदानातून 8.33 टक्के EPS (Employee Pension Scheme) मध्ये जमा करण्यात येते. याशिवाय केंद्र सरकारदेखील मूळ वेतनाच्या 1.16 टक्के योगदान देत असते. हेही वाचा.. ‘आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो’, असं मुलीला सांगत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

संबंधित बातम्या

PFचा व्याज दर घटल्याने काय होईल परिणाम.. EPFO आपल्या एन्युअल ऐक्रुअल्सचा 85 टक्के भाग डेट मार्केटमध्ये तर 15 टक्के भाग एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवला आहे. गत आर्थिक वर्षाच्या मार्चच्या अखेरी इक्विटीजमध्ये EPFO ची एकूण गुंतवणूक 74,324 कोटी रुपये होती. त्यातून 14.74 टक्के रिटर्न मिळाले होते. यामुळे ईपीएफओच्या खातेदारांच्या जमा रकमेवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. हेही वाचा.. ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका…’ मालिकांमधील वादात शशांक केतकरची उडी केव्हा कसे राहिले व्याजदर… आर्थिक वर्ष 2019-20 व्याजदर 8.50% आर्थिक वर्ष 2018-19 व्याजदर 8.65% आर्थिक वर्ष 2017-18 व्याजदर 8.55% आर्थिक वर्ष 2016-17 व्याजदर 8.65% आर्थिक वर्ष 2015-16 व्याजदर 8.8% आर्थिक वर्ष 2014-15 व्याजदर 8.75% आर्थिक वर्ष 2013-14 व्याजदर 8.75%

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या