उच्च पेन्शन योजना
EPS Higher Pension: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPS अंतर्गत हायर पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. तुम्ही आज अर्ज केला नाही तर तुमच्या हातून हायर पेन्शन घेण्याची संधी जाऊ शकते. ईपीएफओ या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवणार की नाही याकडे सर्वांच लक्ष आहे. मात्र अद्याप सरकारकडून हाय पेन्शन वाढवण्यासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. यापूर्वी, त्याची मुदत दोनदा 3 मे आणि नंतर 26 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ईपीएफओने वाढवली होती मुदत 2 मे 2023 रोजी, EPFO ने हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जूनपर्यंत वाढवली होती. 3 मे ते 26 जून 2023 रोजी संपणारी अंतिम मुदत वाढवून, पात्र कर्मचारी आता 26 जूनपर्यंत उच्च पेन्शनसाठी त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. यापूर्वी, EPFO ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर विद्यमान भागधारक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले होते. PF अकाउंटवरुन बॅलेन्स चेक करणं झालं सोपं! इंटरनेटशिवायही काढता येईल माहिती हायर पेन्शन कोणी निवडावी? ज्या कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन हवी आहे त्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडावा. त्याच वेळी, जर तुम्हाला निवृत्तीसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसेल, तर दुसरा पर्याय स्वीकारला पाहिजे. EPS च्या नियमांनुसार, पेन्शन15,000 रुपयांच्या च्या वैधानिक पगारावर काढली जाते. सध्या, नियोक्त्याने केलेल्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएस फंडात जाते. कर्मचारी पेन्शन योजना 1995 म्हणजेच EPS-95 16 नोव्हेंबर 1995 रोजी लागू करण्यात आली. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी, EPS अकाउंटमध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रिब्यूशनसाठी 5000/6500 रुपयांची कॅप होती. त्यानंतर ही कॅप 15,000 रुपये करण्यात आली.