मुंबई, 20 नोव्हेंबर: इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Tesla CEO Elon Musk) अर्थात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्लाचे शेअर्स विकले आहेत. यावेळी इलॉन मस्क यांनी $9 अब्ज किमतीचे शेअर्स विकले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटर पोल घेतल्यानंतर (Twitter Poll by Elon Musk) टेस्लाचे सुमारे $9 अब्ज किमतीचे शेअर्स विकले. ट्विटरवर पोल घेतल्यानंतर मस्क यांनी टेस्लाचे शेअर्स दुसऱ्यांदा विकले आहेत. इलॉन मस्क यांनी टॅक्स भरण्यासाठी टेस्लाचे शेअर्स विकल्याचे सांगण्यात येत आहे. मस्क यांनी $2.2 अब्ज किमतीचे 21 लाख शेअर्स मिळवले होते. पण कर भरण्यासाठी, सुमारे $9 अब्ज किमतीचे 9,34,091 शेअर्स विकले गेले. इलॉन यांच्या निर्णयानंतर टेस्लाचे शेअर्स कोसळले आहेत. हे वाचा- Rakesh Jhunjhunwala Portfolio: महिनाभरात ‘या’ स्टॉकमध्ये 20 टक्के रिटर्नचा अंदाज टेस्ला शेअरच्या किमतीत चढउतार टेस्ला स्टॉकची किंमत 15 नोव्हेंबर रोजी $1013 वर ट्रेड करत होती. मात्र, या घसरणीनंतर या स्टॉकमध्ये वाढ झाली होती. सध्या टेस्लाचा शेअर $1137 (सुमारे 84,491 रुपये प्रति शेअर) वर ट्रेडिंग करत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीस, टेस्लाच्या शेअरची किंमत सुमारे $1230 होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इलॉन मस्क यांनी सोमवारी सुमारे 930 मिलियन डॉलर्समध्ये 9,34,000 हून अधिक समभागांची विक्री केली. इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल शेअर केला होता. त्यांनी टेस्लाच्या त्याच्या 10 टक्के शेअर्सची विक्री करावी का असा सवाल यात विचारला होता. टेस्ला शेअर्सच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा मोठ्या भागातून इलॉन मस्क टॅक्स पेमेंट करणार असल्याची माहिती आहे.
गेल्या आठवड्यात, मस्क यांनी सुमारे 8.2 दशलक्ष टेस्ला शेअर्स सुमारे $8.8 अब्जमध्ये विकले. इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटर पोलवर आपले शेअर्स विकण्याची कल्पना शेअर केल्यानंतर शेअर्सची विक्री सुरू झाली होती. “करापासून वाचण्यासाठी मी माझ्या टेस्ला स्टॉकपैकी 10% विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवतो,” असं ट्वीट त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी केलं होतं. इलॉन यांच्या या ट्वीटवर सुमारे 3.5 दशलक्ष लोकांनी आपली मते दिली होती. यापैकी 57.9 टक्के लोकांनी समभाग विक्रीला पाठिंबा दिला तर 42.1 टक्के लोकांनी विरोधात मतदान केले.