नवी दिल्ली, 13 जून : शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme) सुरू केली आहे. 31 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा 11 वा हप्ता जारी केला होता. यानंतर लवकरच आता पुढचा, म्हणजेच 12 वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला पुढच्या हप्त्यातील रक्कम हवी असेल, तर त्यापूर्वी तुमचं ई-केवायसी (e-KYC) झालं आहे का हे तपासणं आवश्यक आहे. ई-केवायसी अपडेट नसेल, तर पुढच्या हप्त्यातील पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. सरकारने ई-केवायसी (PM Kisan e-KYC) करण्याची मुदतदेखील वाढवली आहे. आता 31 जुलै 2022 या तारखेपर्यंत तुम्ही तुमचं केवायसी अपडेट करू शकता. काय आहे योजना? पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतं. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येते. दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होतो. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते जारी करण्यात आले आहेत. पुढील हप्तादेवखील लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळेच वेळेत केवायसी अपडेट करणं गरजेचं आहे. याबाबत पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) सविस्तर माहिती देण्यात आली आहे. HDFC बँकेकडून ग्राहकांना अलर्ट! एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं, काय काळजी घ्याल? ई-केवायसी असं करा अपडेट » तुम्ही पुढील टप्प्यांनुसार आपलं ई-केवायसी अपडेट करू शकता. » पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाईटवर (pmkisan.gov.in) जा. » उजव्या बाजूला असणाऱ्या ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. »आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. » आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर एंटर करा. » यानंतर गेट ओटीपी पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल. » मिळालेला ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचं केवायसी अपडेट होऊन जाईल. यादीमध्ये पाहा आपलं नाव पीएम किसान योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी आहात की नाही हे पाहण्यासाठी यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते तपासणं गरजेचं आहे. यासाठी सर्वांत आधी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in/) जावं लागेल. त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर बेनिफिशिअरी लिस्ट नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी आपलं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती एंटर केल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. यात तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळेल. यात तुम्ही तुमचं नाव तपासू शकता. रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा हप्ता जमा झाला नाही तर अशी करा तक्रार जर तुम्ही लाभार्थी आहात, तुमचं केवायसी अपडेट आहे; आणि तरीही तुम्हाला 11 वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता. यासाठी पीएम किसान वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर आधार किंवा अकाउंट नंबर, किंवा मोबाईल नंबर एंटर करून गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही तिथे तुमची तक्रार नोंदवू शकता. या व्यतिरिक्त pmkisan-ict@gov.in या आणि pmkisan-funds@gov.in या ईमेल आयडीवर मेल करूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. सोबतच, तुम्ही पीएम-किसान हेल्पलाईन नंबर 011-24300606, 155261 किंवा 1800-115-526 यांवर कॉल करूनही तक्रार नोंदवू शकता.