नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : तुमच्याकडे काही दुर्मीळ, जुन्या नोटा (Old Note) असतील तर त्या रातोरात लखपती (Millionaire) बनवू शकतात. जुन्या नोटांचं, नाण्यांचं कलेक्शन (Collecting Old Notes and Coins) करण्याचा अनेकांना छंद (Hobby) असतो. काही जणांचा लकी नंबरवर (Lucky Numbers) विश्वास असतो. अशा व्यक्ती जुन्या नोटा, नाणी किंवा लकी नंबर असणाऱ्या नोटांसाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. या नोटांपासून लाभ कसा होऊ शकतो, याबद्दल थोडं जाणून घेऊ या. तुमच्याकडे असणाऱ्या दुर्मीळ, जुन्या नोटा, नाणी यांच्याशी संबंधित एक पोस्ट संबंधित वेबसाइटवर करावी लागते. ती पोस्ट पाहिल्यानंतर खरेदीदार स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील. कदाचित विश्वास बसणार नाही, पण तुमच्याकडे एखादी विशेष नंबरची किंवा विशेष प्रकारची जुनी नोट असेल, तर तुम्ही तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर PF चे पैसे काढून घ्यावे का? तुमचं किती नुकसान होऊ शकतं? अनेकांना जुन्या नोटा, नाणी जमा करण्याची खूप आवड असते. जुन्या नोटा, नाणी जमा करणं हा ट्रेंड आहे. हा छंद तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो. काही खास नोटांबद्दल जाणून घेऊ या, ज्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. तुमच्याकडे एखादी विशिष्ट नोट, नाणी असल्यास तुम्ही ते ऑनलाइन विकू शकता. उदाहरणार्थ, कोणाला 786 नंबरची नोट हवी असेल, किंवा कोणाला विशेष नंबरची नोट हवी असेल, कोणी नोटेच्या नंबरमध्ये जन्मतारीख शोधत असेल, तर अशा नोटांची विक्री करताना मोठी किंमत मिळू शकते. याशिवाय ट्रॅक्टरचा फोटो असलेल्या 5 रुपयांच्या नोटेलाही सध्या मागणी आहे. अशा नोटांसाठी तब्बल 2 लाख रुपयेही दिले जातात. तुमच्याकडेही अशी दुर्मीळ नोट असेल, तर तुम्ही ती विकू शकता. 786 नंबरला अनेकांची पसंती 786 क्रमांक असलेली नोट मुस्लिम व्यक्ती खरेदी करतात, असा अनेकांचा समज आहे. परंतु प्राचीन वस्तू जतन करण्याची आवड असणारे अनेक जणही या क्रमांकाच्या नोटाची खरेदी करतात. मुस्लिम धर्मात 786 हा आकडा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि मुस्लिम व्यक्ती तो पवित्र मानतात. केवळ मुस्लिमच नाही, तर अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्या 786 आकडा भाग्यवान असल्याचं मानतात. जुन्या नोटांची येथे करा ऑनलाइन विक्री 1. नोट विकण्यासाठी प्रथम www.ebay.com वेबसाइटला भेट द्या. 2. तुम्हाला होम पेजवर नोंदणी करावी लागेल. 3. तुम्ही ‘सेलर’ म्हणून स्वतःची नोंदणी करा. 4. त्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या नोटेचा किंवा नाण्याचा फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा. 5. जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याची आवड असलेल्या आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या व्यक्तींना Ebay तुमची जाहिरात दाखवेल. 6. यानंतर खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतील. 7. तुम्ही त्यांना तुमच्याकडची नोट तुम्हाला हवी असणारी योग्य किंमत मिळाली तर विकू शकता.