JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता गोदरेज घराण्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद, हे मुंबई आहे कनेक्शन

आता गोदरेज घराण्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद, हे मुंबई आहे कनेक्शन

Godrej Family, Adi Godrej, Jamshed Godrej - देशातलं सर्वात जुनं उद्योगपती घराणं गोदरेज समूहाच्या कुटुंबातला कलह वाढलाय

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : देशातलं सर्वात जुनं उद्योगपती घराणं गोदरेज समूहाच्या कुटुंबातला कलह वाढलाय. सगळ्या व्यावसायिकांच्या घराप्रमाणे गोदरेज कुटुंबातही पैशांवरून तणाव वाढलाय. कुटुंबाचे प्रमुख जमशेद गोदरेज आणि आदी गोदरेज यांच्यात मुंबईच्या एका महाग प्लाॅटवरून वाद सुरू आहे. 100 वर्ष जुन्या ग्रुपचा मुंबईत विक्रोळी इथे 1 हजार एकरचा प्लाॅट आहे. त्यावरूनच वादंग सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोघांमधले संबंध इतके बिघडलेत की देशाचे मोठे कारभारी आणि वकिलांची मदत  घेतली जातेय. मुंबई विद्यापीठात 67 जागांवर भरती, ‘या’ पदांसाठी मागवलेत अर्ज समूहाची अनलिस्टेड कंपनी गोदरेज अँड बायसेवर जमशेद गोदरेजचा मालकी हक्क आहे. त्यांनी बँकर आणि इंडस्ट्रीचे दिग्गज निमेष कंपानी आणि वकील जिया मोदी यांना सल्लागार म्हणूनन नियुक्त केलंय. तर आदी आणि नादिर गोदरेज यांनी कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक आणि कायदा सल्लागार साइरिल श्राॅफ यांची मदत घेतलीय. सोन झालं महाग, 5 वर्षातला गाठला उच्चांक सूत्रांनी सांगितलं की सल्लागारांना मतभेदाचं कारण समजून घेऊन दोन्ही पक्षात समेट घडवून आणायचाय. यातल्या एका सल्लागारानं सांगितलं की यात आता वकील सामील झाल्यानं हा कौटुंबिक मामला राहिलेला नाही. गोदरेज ग्रुपची स्थापना 1897मध्ये अर्देशीर गोदरेज यांनी केली होती. कंपनीचं क्षेत्र रियल इस्टेटपासून FMCG पर्यंत आहे. गोदरेज ग्रुपची मिळकत 5 अब्ज डाॅलरपर्यंत पोचलीय. ‘या’ कामासाठी पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतात महिला आदी आणि नादिर गोदरेज यांच्याकडे ग्रुपच्या तीन लिस्टेड कंपनीज आहेत. यात गोदरेज कंझ्युमर प्राॅडक्ट्स (GCPL), गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज एग्रोवेट आहेत. जमशेद गोदरेज यांची मालकी असलेल्या गोदरेज अँड बाॅयसची गोदरेज प्राॅपर्टीमध्ये 4.64 टक्के हिस्सेदारी आहे. तर GCPL मध्ये 7.34 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय जमशेद गोदरेज आणि फॅमिली ट्रस्टची गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये 8.66 टक्के हिस्सेदारी आहे. नव्या पिढीसोबत ग्रुपची काम करण्याची पद्धत बदललीय. असंही कळलंय की कुटुंब जसजसं मोठं होतं गेलं, तशी लाँग टर्मसाठी रणनीती विकसित केली गेली. शेअर बाजारात गोदरेज प्राॅपर्टीजचं लिस्टिंग 2010मध्ये झालं होतं. कंपनीचा दावा आहे की 2016मध्ये त्यांनी 5 हजार कोटी रुपयांची संपत्ती विकली होती. कंपनीचे चेअरमन आदी गोदरेज आहेत. त्यांचा मुलगा पिरोज्शा गोदरेज एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहे. 2011मध्ये झालेल्या कौटुंबिक करारानुसार 1 हजार एकर जमिनीवर गोदरेज अँड बाॅयसे यांचा मालकी हक्क राहणार आहे. पण गोदरेज प्राॅपर्टीज तो विकसीत करेल आणि त्या बदल्यात एकूण रिव्हेन्यूच्या 10 टक्के देईल. डिझाइन आणि कन्स्ट्रक्शनच्या खर्चाचं ओझं गोदरेज अँड बाॅयसे घेईल. गोदरेज अँड बाॅयसेकडे एकूण 3 हजार एकर जमीन आहे. पण त्याचा दोन तृतीयांश हिश्शावर खारफुटी आहे. त्यांना बाजूला करून प्राॅपर्टी विकसित करणं कठीण आहे. SPECIAL REPORT बँकेला कंटाळून शेतकऱ्यांनी केली ‘दगडां’ची पेरणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या