JOIN US
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊमुळे सेलिब्रिटी शेफ पूजा धिंग्राला मोठा फटका, दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध कॅफे बंद करण्याचा निर्णय

लॉकडाऊमुळे सेलिब्रिटी शेफ पूजा धिंग्राला मोठा फटका, दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध कॅफे बंद करण्याचा निर्णय

लॉकडाऊनमुळे (Lockdown) तर हॉटेल व्यवसायाचे कंबरडं मोडलं आहे. या परिस्थितीत प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पूजा ढिंगराने तिचा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशातील अनेक व्यावसायांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) तर हॉटेल व्यवसायाचे कंबरडं मोडलं आहे.  मोठमोठ्या व्यावसायिकांना देखील या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पूजा ढिंगराने तिचा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 वर्षांपासून पूजा मुंबईतील कुलाबा याठिकाणी Le 15 हा कॅफे चालवते. मात्र आता लॉकडाऊनमुळे तिने हा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.

पूजा ढिंगराने तिच्या इन्स्टाग्रामवर म्हटले आहे की, एप्रिल महिना माझ्यासाठी सोपा नव्हता. या काळात मला काही कठीण निर्णय घ्यावे लागले. माझ्या कॅफेला एवढं प्रेम देण्यासाठी  धन्यवाद आणि माझी कहाणी सांगू देण्यासाठी देखील धन्यवाद. पूजाने एका ब्लॉगच्या माध्यमातून तिची आणि तिच्यासाठी एखाद्या बाळाप्रमाणे असणाऱ्या ले15 कॅफेची कहाणी सांगितली आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये ‘या’ बँकेचा परवाना रद्द, लाखो खातेधारकांना RBIचा झटका ) दरम्यान कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे पर्यटन, एव्हिएशन, वाहतूक या सर्वांवरच परिणाम झाला आहे. परिणामी हॉटेल व्यवसायातील प्रत्येक जण त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या