Driving License: विना ड्रायव्हिंग टेस्ट फक्त 7 दिवसात काढा लायसन्स, फॉलो करा सोपी प्रक्रिया
मुंबई, 24 नोव्हेंबर: जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल, परंतु तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास व्हाल की नाही, याचा विचार करत असाल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला फक्त सात दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. 18 वर्षे वयोगटातील मुलांना मिळेल लर्निंग लायसन्स- दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्यामुळं अनेकांना परवाना मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, 16 ते 18 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. पण त्याला फक्त लर्निंग लायसन्स मिळेल. हा परवाना मिळाल्यानंतर ती व्यक्ती केवळ विना गिअरची गाडी चालवू शकणार आहे. जर तुम्हाला गीअरसह वाहन चालवायचं असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवावं लागेल. हेही वाचा: बाबो! इथे कार पार्किंगसाठी मोजावे लागतात 2.45 कोटी रुपये, पाहा खास पार्किंगचा झक्कास Video हा परवाना काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही यासाठी काही मिनिटांत तुमच्या घरच्या आरामात ऑनलाइन अर्ज करू शकता. एकदा तुम्ही चाचणी उत्तीर्ण केल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. परंतु परवाना मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तुमच्या घराचा पत्ता आणि वयाचा पुरावा दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळेल. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही लर्निंग लायसन्सवर गाडी चालवू शकत नाही. गाडी चालवण्यासाठी त्यासाठी पक्कं लायसन्स काढावं लागेल. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी फ़ॉलो करा या स्टेप्स-