JOIN US
मराठी बातम्या / मनी / Doorstep Banking:आता बँक येईल तुमच्या घरी! असा घेता येईल सर्व्हिसचा लाभ

Doorstep Banking:आता बँक येईल तुमच्या घरी! असा घेता येईल सर्व्हिसचा लाभ

आजकाल बँकिंगशी संबंधित बरीचशी कामे ऑनलाइन करता येतात. मात्र आतापर्यंत जे काम बँकेत गेल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हते, ते काम आता अनेक बँकांनी डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा ते आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

डूअर स्टेप बँकिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 मे: आता बँकिंगशी संबंधित बहुतांश कामे आपण घरी बसून करू शकतो. पण तरीही तुम्हाला पैसे काढणे, चेक जमा करणे, पैसे जमा करणे यासारख्या गोष्टींसाठी बँकेत जावं लागतं. खरंतर या सेवा आता बँकांकडून डोर स्टेपवर दिल्या जातात. मात्र याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की डोअर स्टेप बँकिंग सेवा काय आहे आणि त्याचा फायदा कोण घेऊ शकतो?

बँकांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी डोअर स्टेप सुविधा सुरू केली होती परंतु काही बँका त्यांच्या सर्व ग्राहकांना या सेवा पुरवतात. या सेवांमध्ये कॅश जमा करण्यासाठी कॅश पिकअप. कॅश पैसे काढण्यासाठी कॅश डिलिव्हरी आणि चेक डिपॉझिट आणि आर्थिक व्यवहारांसाठी सुविधांचा समावेश आहे.

कोणत्या बँका देतात या सुविधा

सध्या देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना डोअर स्टेप सुविधा देत आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक इत्यादींचा समावेश आहे. तथापि, या सेवांच्या बदल्यात बँकांकडून काही शुल्क देखील घेतले जातात, जे प्रत्येक बँकेनुसार बदलतात.

तुमच्या भाडेकरुने बनावट आधारकार्ड तर दिलेलं नाही ना? असं करा व्हेरिफाय

अशी करा सर्व्हिस रिक्वेस्ट

तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरशी बोलून किंवा बँकेच्या वेबसाइटवर बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग सेवांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करून घरोघरी डिलिव्हरीची सुविधा मिळवू शकता. नुकतेच, अनेक बँकांनी त्यांच्या सीनियर सिटीझन ग्राहकांना लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी ही सेवा दिली होती.

सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये फरक काय? काय होतात फायदे?

संबंधित बातम्या

किती फिस द्यावे लागते?

डोअर स्टेप बँकिंग सेवांची फिस प्रत्येक बँकेत वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँक कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसाठी 200 रुपये अधिक टॅक्स आकारत आहे. एचडीएफसी बँक सध्या या सेवा केवळ ज्येष्ठ नागरिकांना देत असली तरी. बँक किमान 5000 रुपये आणि जास्तीत जास्त 25000 रुपये रोख डिलिव्हरी करते. तर ही बँक इतर फायनेंशियल ट्रांझेक्शन सर्व्हिससाठी 100 रुपये आणि टॅक्सच्या चार्जसह डोर-स्टेप बँकिंग फॅसिलिटी देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या