कॅरीबॅगचे वेगळे चार्ज घेतले जात असतील तर तुम्हीही करु शकता तक्रार
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: मॉल, रेस्टॉरंट किंवा इतर कोणत्याही दुकानात कॅरीबॅगसाठी अतिरिक्त शुल्क घेतले जात असेल तर ते अजिबात देऊ नका. याचे कारण असे की, विक्रेत्याने वस्तू खरेदीदाराला योग्य पद्धतीने वितरीत करणे बंधनकारक आहे. ग्राहकाने खरेदी केलेला माल दुकानदाराला अशा प्रकारे पॅक करावा लागेल की, तो त्यांना सहज पकडून घरी नेता येऊ शकेल. एखाद्या दुकानदाराने कॅरीबॅगसाठी ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारले तर ते चुकीचे आहे. तसे केल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार करु शकतो. नुकत्याच झालेल्या एका प्रकरणात, डॉमिनोज पिझ्झाला चंदीगड ग्राहक आयोगाने कॅरीबॅगसाठी ग्राहकाकडून शुल्क आकारल्याबद्दल दंड ठोठावला होता. चंदीगडचे रहिवासी पारस शर्मा यांनी डॉमिनोज पिझ्झा, सेक्टर 15, चंदीगडच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, 29 मे 2019 रोजी तक्रारदार सेक्टर 15 मधील डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये गेला आणि त्याने गोल्ड कॉर्न पिझ्झा आणि एक सॅशे ऑर्डर केली. रेस्टॉरंटने त्याचे बिल 79.75 रुपये केले. या बिलात रेस्टॉरंटने कॅरीबॅगसाठी 12 रुपये वेगळे पैसे घेतले होते. तक्रारदाराने कॅरीबॅगसाठी घेतलेले 12 रुपये परत करण्याची मागणी केली, परंतु त्यावर तोडगा निघाला नाही.
लेकीच्या लग्नाचं टेंशन घेत असाल तर डोंट वरी! ही स्किम देतेय लाखो रुपयेग्राहक आयोगाने रेस्टॉरंटच्या या कृतीला सेवेतील निष्काळजीपणा आणि अनुचित व्यापार पद्धती असे मह्टले. रेस्टॉरंटने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, ते कागदी कॅरी बॅग खरेदी करतात आणि ग्राहकांकडून त्यासाठी शुल्क आकारतात. कॅरीबॅग चार्ज करण्यापूर्वी तक्रारदाराला विचारणा करण्यात आली. त्याच्या संमतीनंतरच चार्ज वसूल करण्यात आले होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आयोगाने, नॅशनल कमीशनच्या बिग बाजार विरुद्ध अशोक कुमार 2020 च्या पुनरीक्षण याचिकेचा दाखला देत म्हटले की, विक्रेत्याने खरेदीदाराला वस्तू योग्य प्रकारे वितरित करणे बंधनकारक आहे. विक्रेत्याला मालाच्या योग्य डिलीवरीसाठी पॅकिंगचा खर्च सहन करावा लागेल.
होम लोनचा EMI वाढला असेल तर नो टेंशन! हा पर्याय आहे बेस्टकमिशनने डॉमिनोजला तक्रारदाराकडून कॅरीबॅगसाठी घेतलेले 12 रुपये परत करावेत. तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासाची आणि शोषणाची भरपाई म्हणून 1,000 रुपये आणि न्यायालयीन खर्च म्हणून 500 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.