नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेल दरवाढ, सीएनजी वाढीनंतर आता सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. सरकारने LPG Gas Cylinder चे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. तेल कंपन्यांनी विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर आता देशाची राजधानी दिल्लीत घरगुती सिलेंडरचा दर 884.50 रुपयांनी वाढून 899.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. हे नवे दर आज 6 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. याच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 ऑक्टोबरला सरकाने 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचा दर तबब्ल 43 रुपयांनी वाढवला होता. त्यानंतर आता 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत 19 किलो कमर्शियल LPG Cylinder चा भाव 1693 रुपयांनी वाढून 1736.50 रुपये इतका झाला आहे.
तुमच्या शहरात काय आहे घरगुती गॅसचा आताचा दर - - दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडर 899.50 रुपये - कोलकातामध्ये घरगुती सिलेंडरचा भाव 911 रुपयांवरुन 926 रुपये झाला आहे. - मुंबईत गॅस सिलेंडर 844.50 रुपयांनी वाढून 899.50 रुपये इतका झाला. - चेन्नईत सिलेंडर दर 900.50 रुपयांवरुन 915.50 रुपये झाला.
याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.