JOIN US
मराठी बातम्या / मनी / 10 लिटर बिअर बनवण्यासाठी किती किलो धान्यांच्या कचऱ्याचा केला जातो वापर?, वाचा सविस्तर

10 लिटर बिअर बनवण्यासाठी किती किलो धान्यांच्या कचऱ्याचा केला जातो वापर?, वाचा सविस्तर

या बिअरची निर्मिती कशी होते, हे तुम्हाला माहिती आहे का? स्टार्च तयार करून आणि किण्वन प्रक्रियेद्वारे (Fermentation process) बिअर तयार केली जाते.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जानेवारी:  दारु किंवा बिअर पिणाऱ्यांना ती पिण्यासाठी काहीतरी कारण लागतं. मग ते काहीही कारण असू शकतं. कुठलाही लहान-मोठा प्रसंग असो बहुतेकजण अतिशय सहजपणे बिअर पितात. बिअर हे जगातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारं अल्कोहोलिक ड्रिंक (Alcoholic drink) आहे. पाणी आणि चहानंतर तिसरे सर्वांत लोकप्रिय ड्रिंक म्हणून बिअरकडे पाहिलं जातं. बिअर पचायला हलकी आणि प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. पण, या बिअरची निर्मिती कशी होते, हे तुम्हाला माहिती आहे का? स्टार्च तयार करून आणि किण्वन प्रक्रियेद्वारे (Fermentation process) बिअर तयार केली जाते. मुख्यत्वे बार्ली, गहू, मका, तांदूळ आणि ओट्स या धान्यांचा (Grains) वापर करून बिअर निर्मिती होते. युरोपियन देशांमध्ये तर धान्याचा आणि फळांचा उपयोग करून घरच्याघरीच बिअर तयार केली जाते. बिअर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य लागतं. शिवाय त्यातून तयार होणाऱ्या टाकाऊ घटकांचं (Waste) प्रमाणदेखील जास्त आहे. बिअरनिर्मितीतून तयार होणारा कचरा इतका जास्त असतो की जपानमध्ये तर या कचऱ्याचा वापर करून अनेक स्टार्टअप्सही सुरू झालेले आहेत. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Multibagger Share : सहा दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये, ‘या’ स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल

 बिअर बनवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. पण, धान्यापासून सर्वांत जास्त प्रमाणात बिअर बनवली जाते. त्यामुळे ज्या प्रमाणात बिअरची मागणी वाढते त्या प्रमाणात धान्याचा अपव्ययही वाढतो आहे. कारण, बिअरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होते. डीडब्ल्यू चॅनेलनं दिलेल्या वृत्तानुसार, जपानमधील (Japan) बिअरनिर्मितीचा (Beer production) विचार केल्यास, 10 लिटर बिअर बनवण्यासाठी 200 किलो धान्याचा वापर होतो. त्यातील बहुतांश भागाचं रुपांतर नंतर कचऱ्यामध्ये होतं. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, दररोज किती कचरा तयार होत असेल.

बिअरनिर्मिती दरम्यान शिल्लक राहिलेला अन्नधान्याचा टाकाऊ भाग शेतीमध्ये खत (Fertilizer) म्हणून उपयोगी पडतो. असं असलं तरी लोक हा कचरा जाळून टाकण्याला प्राधान्य देतात. पण, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता बिअरनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पुढाकार घेऊन धान्याच्या टाकाऊ भागापासून कागदनिर्मिती (Papermaking) सुरू केली आहे. जपानमध्ये सध्या बहुतेक बिअर कंपन्या कागद आणि विविध प्रकारच्या वस्तू बनवतात. याशिवाय, नागरिकांना या वस्तूंचा वापर करावा यासाठी जनजागृतीही करत आहेत.

अर्थसंकल्पानंतर Mobile, Gadgets स्वस्त होणार? जाणून घ्या सरकार काय पाऊल उचलणार?

संबंधित बातम्या

जपाननं अवलंबलेली पद्धत जगातील इतर देशांनीदेखील स्वीकारण्याची गरज आहे. असं झाल्यास पर्यावरणाची होणारी हानी तर थांबेलच शिवाय टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मितीलाही हातभार लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या