JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business loan: तुम्हालाही व्यवसाय कर्जासाठी अर्ज करायचाय? ‘ही’ कागदपत्रं आहेत आवश्यक

Business loan: तुम्हालाही व्यवसाय कर्जासाठी अर्ज करायचाय? ‘ही’ कागदपत्रं आहेत आवश्यक

Business loan: तुम्ही देखील व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करावी.

जाहिरात

Business loan: तुम्हालाही व्यवसाय कर्जासाठी अर्ज करायचाय? ‘ही’ कागदपत्रं आहेत आवश्यक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर: भारत हा जगातील सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या देशांपैकी एक आहे. अलीकडं भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. स्टार्टअप्सच्या बाबतीतही भारताची कामगिरी चांगली आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, नवीन युगातील तंत्रज्ञानाचा झपाट्यानं स्वीकार करणं आणि एमएसएमई व्यवसायांचा उदय ही देशाच्या वाढीची दोन प्रमुख कारणं आहेत. स्थानिक स्टार्टअप्स आणि छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या पुढाकारामुळे अनेक उद्योजक त्यांच्या स्वत:च्या कंपन्या सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज ही आवश्यक गोष्ट आहे. वेगवेगळ्या व्यवसायांच्या वेगवेगळ्या आवश्यकता असतात, परंतु कर्जासाठी अर्ज करण्याची कागदपत्रे सारखीच असतात. वेळेची बचत करण्यासाठी आणि बँकांकडून कर्ज नाकारण्याची शक्यता कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही देखील व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करावी. अचूक रकमेसाठी अर्ज करा:  कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यापूर्वी पात्रतेशी संबंधित गोष्टी जाणून घ्याव्यात. यासोबतच कर्जदाराने त्याला किती कर्जाची गरज आहे हे देखील नमूद करायला हवं. अतिरिक्त कर्जाची रक्कम घेतल्यास अधिक खर्च होऊ शकतो आणि कमी रक्कम व्यवसायाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. म्हणून अचूक रकमेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या कर्जाची आवश्यकता किती आहे, हे आधी तपासलं पाहिजे. व्यवसाय कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांना कर्जाच्या अर्जासाठी एक सोपी अर्ज प्रक्रिया हवी असते. कर्जासाठीचा आपला अर्ज स्वीकारला जावा, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही अर्ज करतेवेळी अचूक कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे. मुख्यतः, क्लिक केलेल्या अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह फॉर्म अचूकपणे भरला पाहिजे. हेही वाचा-  PF मधील ठेवींवर व्याज कधी थांबते? अकाउंट क्लोज, टॅक्सचे नियम माहिती आहे का? व्यवसाय कर्जासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक:

व्यवसायाचा पुरावा- तुम्ही करत असलेल्या व्यवसायाशी संबंधित आणि ज्यासाठी तुम्हाला कर्जाची गरज आहे, त्याची कागदपत्रेही जोडावी लागतील. कर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. व्यवसायाचा पत्ता- लहान व्यावसायिकांनी हे दस्तऐवज मूळ असल्याची खात्री करावी. कर्जासाठी अर्ज करताना ही कागदपत्रे वित्तीय संस्थांना द्यावी लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या