मुंबई, 12 ऑगस्ट : सगळेच जण ATM द्वारे पैसे काढतात. जास्त प्रमाणात ATMचा वापर केला जातोय, तसा फ्राॅडही वाढतोय. तुम्ही थोडी काळजी घेतली नाही तर तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. डेबिट कार्डाचं क्लोनिंग होऊ शकतं. कार्ड क्लोनिंग म्हणजे तुमच्या पूर्ण माहितीची चोरी करून तसंच दुसरं कार्ड बनवलं जातं. तुम्ही काही टिप्स लक्षात घेऊन सुरक्षित ट्रॅन्झॅक्शन करू शकता. अशी होते चोरी हॅकर कुठल्याही युजरचा डेटा ATM मशीनमध्ये कार्ड लावण्याच्या स्लाॅटमध्ये चोरू शकतात. ATM मशीनच्या स्लाॅटमध्ये असं डिव्हाइस लावतात ज्यामुळे तुमच्या कार्डाला पूर्णपणे स्कॅन केलं जातं. त्यानंतर ब्लू टुथ किंवा वायरलेस डिव्हाइसमधून तुमचा डेटा चोरला जातो. मोदी सरकारची नवी योजना, स्वयंपाकाच्या तेलापासून ‘अशी’ चालेल तुमची कार अशी घ्या काळजी तुमच्या डेबिट कार्डाचा पूर्ण अॅक्सेस घेण्यासाठी हॅकर्सकडे तुमचा पिन नंबर असणं आवश्यक आहे. हॅकर्स पिन नंबरला कॅमेऱ्यातून ट्रॅक करू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही ATM मध्ये पिन नंबर टाकता तेव्हा तो दुसऱ्या हातानं लपवा. म्हणजे CCTV मध्ये तो दिसणार नाही. जिओ फायबरची सुविधा मिळणार 5 सप्टेंबरपासून, देशभरात करू शकणार मोफत फोन जेव्हा तुम्ही ATM मध्ये जाता तेव्हा एटीएम मशीनच्या कार्ड स्लाॅटकडे लक्ष द्या. तो सैल आहे का, त्यात काही फरक जाणवतोय का, ते नीट पाहा. मुकेश अंबानी यांनी केली जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा तुम्ही हॅकरच्या जाळ्यात अडकलात आणि बँकाही बंद असताल, तर ताबडतोब तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा. कारण पोलिसांना तिथे हॅकरच्या बोटांचे ठसे सापडतील. शिवाय तुमच्या जवळ ब्लुटूथ कनेक्शन चालू आहे का ते पाहा. त्याद्वारे तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचू शकाल. ‘तो’ पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO