JOIN US
मराठी बातम्या / मनी / Demat Account: 30 सप्टेंबरपर्यंत हे महत्वाचं काम पूर्ण करा, अन्यथा तुमचे डिमॅट खाते बंद होईल

Demat Account: 30 सप्टेंबरपर्यंत हे महत्वाचं काम पूर्ण करा, अन्यथा तुमचे डिमॅट खाते बंद होईल

डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी ऑथेंटिकेशन फॅक्टर म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. दुसरीकडे, ऑथेंटिकेशन हा नॉलेज फॅक्टर असू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर : शेअर बाजारात जर तुम्ही गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. डिमॅट खातेधारकांनी 30 सप्टेंबरपर्यंत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही कारणाने तसे करू शकत नसाल तर तुम्ही डिमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाही. या संदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजने जूनमध्ये परिपत्रक जारी केले होते. आता त्याच्या सदस्यांना त्यांच्या डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी ऑथेंटिकेशन फॅक्टर म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. दुसरीकडे, ऑथेंटिकेशन हा नॉलेज फॅक्टर असू शकतो. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फिंगरप्रिंट स्कॅनिंग, फेशियल रेकग्निशन किंवा व्हॉइस रेकग्निशन वापरते. नॉलेज फॅक्टरमध्ये पासवर्ड, पिन किंवा कोणताही पजेशन फॅक्टर समाविष्ट असू शकतो. त्याची माहिती फक्त यूजर्ससाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना एसएमएस आणि ई-मेल या दोन्ही माध्यमातून OTP मिळेल. पासवर्ड नाही एनएसईने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, जर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन कोणत्याही कारणामुळे शक्य नसेल, तर यूजर्सना नॉलेज फॅक्टर वापरावे लागेल. ज्यामध्ये पासवर्ड/पिन, पझेशन फॅक्टर आणि यूजर आयडी असू शकतो. याचा वापर टू फेस ऑथेंटिकेशन म्हणून केला पाहिजे. तज्ञ म्हणतात की बहुतेक स्टॉक ब्रोकर्स दुसरा ऑथेंटिकेशन फॅक्टर वापरत आहेत. यामध्ये पासवर्डचा समावेश नाही. 30 सप्टेंबर शेवटची तारीख या संदर्भात, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या 2018 च्या परिपत्रकाचा हवाला दिला आहे. ऑथेंटिकेशन घटकांबाबत या परिपत्रकात तसा फरक आहे. त्यामुळे NSE ने 30 सप्टेंबरपासून लॉगिनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या