JOIN US
मराठी बातम्या / मनी / डेबिट-क्रेडिटकार्डचे 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम, आजच जाणून घ्या नाहीतर....

डेबिट-क्रेडिटकार्डचे 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम, आजच जाणून घ्या नाहीतर....

१ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशनचा नियम बदलणार असल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सप्टेंबर महिना संपायला आता आठवडाभरही कमी उरला आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकेशी संबंधित अनेक नियम दिवसेंदिवस बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. यासाठी आरबीआयने मुदतही दिली आहे. याशिवाय इतर अनेक विभागांकडूनही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशनचा नियम बदलणार असल्याचं सांगितलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार टोकनायझेशन सिस्टममध्ये बदल केल्यानंतर, कार्डधारकांचा पेमेंट अनुभव चांगला असेल. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, जर ग्राहकाने डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) किंवा अॅपद्वारे व्यवहार केले तर सर्व तपशील एनक्रिप्टेड कोडमध्ये सेव्ह राहतील. सध्या हे सगळे डिटेल्स कंपनीच्या सर्व्हरवर सेव्ह होतात. ते न होता आता एका एक्रिप्टेड कोडवर सेव्ह होणार आहेत. त्यामुळे आता फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. तर ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित सेवा होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा गोळा करण्यावर बंदी आणली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. अलट पेंन्शन योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक बदल करण्यात आला आहे. टॅक्स भरणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही टॅक्स भरत असाल आणि तुम्हाला ही योजना हवी असेल तर सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या