मुंबई, 5 मार्च : रशिया-युक्रेन संकटामुळे (Russia-Ukraine Crises) जागतिक बाजारपेठेची स्थिती बिकट आहे. शेअर बाजार मोठ्या चढ-उतारातून जात आहे. क्रिप्टो मार्केटचीही (Crypto Market) हीच स्थिती आहे. गेल्या 24 तासांत, क्रिप्टोकरन्सी मार्केटचे कॅपिटलायझेशन 4.49 टक्क्यांहून अधिक घटले आहे आणि ते 1.75 ट्रिलियन डॉलर इतके आहे. त्याच कालावधीत, त्याच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये देखील 3.43 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ती 83.23 अब्ज डॉलर झाली आहे. डिसेन्ट्रलाईज्ड फायनान्स (DeFi) गेल्या 24 तासांत 14.08 अब्ज डॉलर होते, जे गेल्या 24 तासांतील क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या सुमारे 16.92 टक्के आहे. याच कालावधीत stablecoins मधील एकूण वॉल्यूम 69.85 अब्ज डॉलर होता, जो गेल्या 24 तासात क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या सुमारे 83.92 टक्के आहे. बिटकॉइन 40 हजार डॉलर्सच्या खाली गेल्या 24 तासांत बिटकॉइनच्या मार्केट शेअरमध्ये 0.57 टक्क्यांची घसरण झाली असून तो 42.44 टक्क्यांवर दिसत आहे. 5 मार्च रोजी सकाळी बिटकॉइन 39,047.24 डॉलरवर ट्रेड करत होता. Russia-Ukraine युद्धाने शेअर बाजाराला हादरे, बाजार 12 सेशनमध्ये 4000 अंकांनी खाली कार्डानो (Cardano) जर आपण रुपयांमध्ये पाहिलं तर, गेल्या 24 तासात 4.43 टक्क्यांच्या घसरणीसह, बिटकॉइन 31,20,419 वर दिसला, तर इथरियम 2.6 टक्क्यांनी घसरून 2,09,584.5 वर दिसत आहे. त्याच कालावधीसाठी, कार्डानो 2.98 टक्क्यांनी घसरून 66.86 रुपयांवर आणि Avalanche 2.01 टक्क्यांनी घसरून 6,003.3 रुपयांवर दिसत आहे. दुसरीकडे, Polkadot 3.65 टक्क्यांनी घसरून 1,319.01 रुपयांवर आणि Litecoin 4.3 टक्क्यांनी घसरून 8,058 रुपयांवर आहे. दुसरीकडे, Tether 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 79.52 रुपयांवर दिसत आहे. Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या Dogecoin दरम्यान, Memecoin SHIB 1.96 टक्क्यांनी घसरत आहे, तर Dogecoin 1.27 टक्क्यांनी घसरुन 9.79 रुपयांवर आणि Terra (LUNA) 10.78 टक्क्यांनी घसरत 6,549.03 रुपयांवर आहे. क्रिप्टोमार्केटशी संबंधित इतर बातम्या पाहिल्यास, फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, स्विस फेडरल सरकार रशियन नागरिक आणि व्यावसायिकांची क्रिप्टो मालमत्ता गोठवण्याची तयारी करत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मुद्दा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे.