JOIN US
मराठी बातम्या / मनी / Cryptocurrency च्या मार्केट कॅपमध्ये घसरण; मात्र Bitcoin, Ethereum मध्ये उसळी

Cryptocurrency च्या मार्केट कॅपमध्ये घसरण; मात्र Bitcoin, Ethereum मध्ये उसळी

Qrkita टोकन (QRT), बर्ड टोकन (BIRD) आणि Dogecolony (DOGECO) ही गेल्या 24 तासांत सर्वाधिक चलनात असलेली चलनं होती. Qrkita टोकन (QRT) ने गेल्या 24 तासांमध्ये 480.52 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आज 4 फेब्रुवारी रोजी मोठी घसरण झाली. ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 4.44 टक्क्यांनी घसरून 1.63 ट्रिलियन डॉलरवर आला. क्रिप्टोकरन्सीचे बाजार भांडवल नक्कीच कमी झाले आहे, परंतु शुक्रवारी बिटकॉइन (Bitcoin) आणि इथरियममध्ये (Ethereum) लक्षणीय वाढ झाली. गेल्या 24 तासांमध्‍ये सर्वात मोठ्या वाढणार्‍या चलनांबद्दल बोलायचं तर इथरियम 6.41 टक्क्यांनी आणि सोलाना (Solana) 8 टक्क्यांच्या वाढीसह टॉपवर आहे. या दोन क्रिप्टोकरन्सी व्यतिरिक्त, टेरा लुना (Terra– LUNA), एवलांच (Avalanche AVAX), आणि पोल्काडॉट (Polkadot) यामध्ये देखील वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून ‘या’ बँकेचा परवाना रद्द, खातेधारकांवर काय परिणाम होणार? चेक करा एका आठवड्यात इथरियममध्ये 17 टक्क्यांची उसळी दुपारी 3 च्या सुमारास Bitcoin (Bitcoin Price Today) 37,968.55 डॉलरवर 2.62 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. एका आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, बिटकॉइनच्या किंमतीत 3.39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इथरियम 6.41 टक्क्यांनी वाढली आहे आणि हे कॉईन 2,830.85 डॉलरवर व्यापार करत होते. एका आठवड्यात इथरियम 17.70 टक्क्यांनी वाढला आहे. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.7 टक्के आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.4 टक्के आहे. Harsha Engineers चा IPO साठी सेबीकडे अर्ज दाखल, 755 कोटी उभारण्याची योजना 24 तासांत सर्वाधिक वाढणारी चलने Qrkita टोकन (QRT), बर्ड टोकन (BIRD) आणि Dogecolony (DOGECO) ही गेल्या 24 तासांत सर्वाधिक चलनात असलेली चलनं होती. Qrkita टोकन (QRT) ने गेल्या 24 तासांमध्ये 480.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. बर्ड टोकन (BIRD) ने याच कालावधीत 471.39 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. याशिवाय डोजेकॉलनी (DOGECO) मध्ये 448.64 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या