JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel: कच्च्या तेलाची किंमत 93 डॉलर पार, वाढत्या किमतीचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Petrol-Diesel: कच्च्या तेलाची किंमत 93 डॉलर पार, वाढत्या किमतीचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

महागड्या क्रूडमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. यामुळे तुमचा इंधनावरील खर्च वाढेल. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती प्रति बॅरल 93 डॉलरच्या वर गेल्या आहेत. कच्च्या तेलाचा हा दर गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मागणीपेक्षा कमी जागतिक पुरवठा, रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढता तणाव आणि अमेरिकेतील खराब हवामान यामुळे क्रूडच्या किमती सातत्याने वाढत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मोठी मागणी पाहता क्रूडची किंमत लवकरच प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. केवळ यावर्षी त्याची किंमत सुमारे 20 टक्क्यांनी वाढली आहे. प्रश्न असा आहे की क्रूडच्या किमती वाढतच राहिल्या तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. महागड्या क्रूडमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) वाढू शकतात. यामुळे तुमचा इंधनावरील खर्च वाढेल. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्या अद्याप दरात वाढ करत नसल्याचे बोलले जात आहे. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी लागणार आहेत. यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. PF Account वर 1 एप्रिलपासून कर भरावा लागणार, तुमच्यावर काय परिणाम होईल? वाचा सविस्तर महागाई वाढू शकते पेट्रोल आणि डिझेल महा झाल्यावर तुमचा इंधनाचा खर्च तर वाढेलच, शिवाय महागाईही वाढेल. डिझेलचा वापर मालवाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे डिझेल महाग झाल्यावर वाहतूक कंपन्या मालवाहतुकीचे भाडे वाढवतात. त्यामुळे फळे आणि भाज्यांसह बहुतांश वस्तूंच्या किमती वाढतात. देशात आधीच महागाई वाढत आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) 5.59 टक्क्यांवर पोहोचली. हा पाच महिन्यांतील उच्चांक आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयावर दबाव भारत आपल्या गरजेच्या जवळपास 80 टक्के पेट्रोलियम आयात करतो. पेट्रोलियम आयातीवर मोठा खर्च केला जातो. सरकारला पेट्रोलियमची किंमत मुख्यतः डॉलरमध्ये मोजावी लागते. त्यामुळे देशातील पेट्रोल बिल वाढल्याचा परिणाम रुपयावरही होतो. डॉलरला जास्त मागणी असल्याने रुपयावर दबाव वाढतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी तो 74.73 च्या पातळीवर होता. गेल्या वर्षी 7 फेब्रुवारीला तो 72.78 च्या पातळीवर होता. अशाप्रकारे, वर्षभरात ते 2 रुपयांपेक्षा अधिक कमकुवत झाले आहे. Multibagger Stocks: ‘या’ शेअर्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई, तुमच्याकडे आहेत का? नोव्हेंबरमध्ये सरकारने कर कमी केले होते देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 109.98 रुपये होता. तिथे डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर होता. दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर होते. बिहार, बंगाल, मध्य प्रदेशसह बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपये आहे. महागडे पेट्रोल आणि डिझेलपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांनी कमी करण्यात आले. त्यानंतर दिल्लीसह अनेक राज्यांनीही आपापल्या राज्यात व्हॅट कमी केला होता. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला नसता तर काही राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत 125 रुपयांपर्यंत पोहोचली असती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या