क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड करता येईल पोर्ट
Credit-Debit Card Portability: प्रत्येक ग्राहक कंपनीच्या कोणत्याही उत्पादन किंवा सेवांबद्दल असमाधानी असल्यास पोर्टेबिलिटीचा ऑप्शन असतो. हा ऑप्शन अनेक सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही सिमपासून तर इन्शुरन्स पॉलिसी देखील पोर्ट करू शकता आणि आता लवकरच तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील पोर्ट करू शकणार आहात. RBI ने एक सर्कुलर जारी करून याचा प्रस्ताव दिला आहे. जे डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड यूझर्सना त्यांच्या पसंतीचे कार्ड नेटवर्क निवडण्याचे अधिकार देते. या प्रस्तावावर आरबीआयने 4 ऑगस्ट 2023 पर्यंत बँका आणि ग्राहकांकडून सूचना मागवल्या आहेत.
RBI च्या ड्राफ्टमध्ये सर्कुलर काय? आरबीआयच्या ड्राफ्ट सर्कुलरनुसार, कार्ड जारी करणाऱ्यांना कार्ड नेटवर्कशी कोणतीही व्यवस्था किंवा करार करण्यास मनाई असेल जी त्यांना इतर कार्ड नेटवर्कच्या सेवांचा लाभ घेण्यापासून प्रतिबंधित करते. आरबीआयने म्हटले आहे की, ‘फायनेंशियल इंस्टीट्यूशन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्री-पेड कार्ड कोणत्याही विशिष्ट कार्ड नेटवर्कसाठी जारी करू नयेत. लोकांना त्यांच्या आवडीचे नेटवर्क निवडण्याचा ऑप्शन मिळाला पाहिजे. हा प्रस्ताव सध्याच्या नियमांना आव्हान देतो. कारण सध्या कार्ड नेटवर्क निवडी जारीकर्ते आणि नेटवर्कमधील करारांद्वारे पूर्व-निर्धारित केल्या जातात. Loan on FD: फिक्स्ड डिपॉझिटवर सहज मिळतं लोन, जाणून घ्या व्याजदर किती आरबीआयच्या ड्राफ्ट सर्कुलरनुसार, कार्ड जारी करणारे बँक आपल्या ग्राहकांना अनेक कार्ड नेटवर्कमधून एक निवडण्याचा पर्याय प्रदान करतल. या ऑप्शनचा वापर ग्राहक कार्ड जारी करताना किंवा त्यानंतर कधीही करु शकतात. Fixed Deposit: गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी! 2 वर्षांच्या एफडीवर या 5 बँका देताय जबरदस्त लोन कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटी म्हणजे काय? कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटी म्हणजे ग्राहकाला त्याचे कार्ड एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमध्ये ट्रान्सफर करण्याचा अधिकार. जसं आपण तोच फोन नंबर ठेवून आपले टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरला बदलू शकतो. त्याचप्रमाणे, कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटी कार्डधारकांना एका वेगळ्या पेमेंट नेटवर्कवर स्विच करताना आपले सध्याचे कार्ड बॅलेन्स आणि क्रेडिट हिस्ट्री टिकवून ठेवण्याची परवानगी देते. सध्याच्या काळात भारतात 5 कार्ड नेटवर्क कंपन्या वीजा, मास्टर कार्ड, रुपे, अमेरिकन एक्सप्रेस आणि डायनर क्लब आहे. या कंपन्यांचा वेगवेगल्या फायनेंशियल इंस्टिट्यूशनसोबत टायअप आहे. या कारणामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीचं कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय मिळत नाही.परंतु, कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटी लागू झाल्यानंतर ग्राहकांना हे अधिकार मिळू लागतील.