JOIN US
मराठी बातम्या / मनी / Credit Card ने चुकूनही करु नका 'ही' 3 कामं, होईल मोठं नुकसान!

Credit Card ने चुकूनही करु नका 'ही' 3 कामं, होईल मोठं नुकसान!

क्रेडिट कार्ड वापरताना लोक नेहमीच विसरुन जातात की, ते कर्ज घेऊ शॉपिंग करत आहेत. आज आपण अशा ट्रांझेक्शनविषयी जाणून घेणार आहोत. जे क्रेडिट कार्डने कधीच करु नयेत.

जाहिरात

क्रेडिट कार्ड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकांना लहान-मोठे सर्वच ट्रांझेक्शन क्रेडिट कार्डने करायचे आहेत. आपला फायदा होत असेल तर मग असं करणं सहाजिकच आहे. कारण तुम्ही जितके जास्त ट्रांझेक्शन कराल तितके जास्त रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील आणि नंतर ते रिवॉर्ड पॉइंट्स गिफ्ट, शॉपिंग किंवा कॅशबॅकसाठी वापरले जाऊ शकतात. पण अनेकदा, क्रेडिट कार्डचा वापर करताना, लोक हे विसरतात की ते खरंच कर्ज घेऊन खरेदी करत आहेत. पण नंतर त्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. चला जाणून घेऊया अशा 3 ट्रांझेक्शनविषयी, जे कधीही क्रेडिट कार्डने करू नये, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. 1- एटीएममधून कॅश काढायची चूक करु नका बँक असो किंवा एजंट सर्वच तुम्हाला क्रेडिट कार्ड विकताना त्यातील एक खास फिचर नक्कीच सांगतात. ते म्हणजे याच्या मदतीने तुम्ही कॅश काढू शकता. पण तुम्ही काढलेल्या कॅशवर पहिल्या दिवसापासून जास्त व्याज लागेल हे तुम्हाला सांगितलं जात नाही. हे व्याज दरमहा 2.5 ते 3.5 टक्के आकारले जाऊ शकते. या सोबतच, तुम्हाला फ्लॅट ट्रांझेक्शनवरही टॅक्स भरावा लागेल. एकीकडे क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीचे बिल भरण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा कालावधी मिळतो आणि ड्यू डेटपर्यंत बिल न भरल्यास तुमच्यावर व्याज आकारले जाते. तर दुसरीकडे एटीएममधून काढलेली कॅश परतफेड करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि व्याज जमा होऊ लागते. Pan-Aadhaar Link : मोदी सरकार आधार पॅन लिंकची मर्यादा वाढवणार का तुमच्याकडे फक्त 30 तास 2- इंटरनॅशनल ट्रांझेक्शन पडू शकते महागात प्रत्येक क्रेडिट कार्डचे फिचर म्हणजे ते परदेशातही वापरता येते. क्रेडिट कार्डचे हे फिचर अनेकांना आकर्षित करते. परंतु अनेकांना त्यामागचं गणित समजत नाही. परदेशात क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला ट्रांझेक्शन फिस भरावी लागते. जे सतत चढ-उतार होत असते. तसंच, तुम्हाला परदेशात कॅश रकमेऐवजी कार्ड वापरायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डऐवजी प्रीपेड कार्ड वापरू शकता. Credit Score: कसं कॅल्क्युलेट होतं क्रेडिट स्कोअर? एकदा जाणून घेतल्यावर कधीच अडकणार नाही लोन 3- बॅलेन्स ट्रान्सफरमध्ये जास्त वापर अनेक क्रेडिट कार्डांवर बॅलन्स ट्रान्सफर हे फिचर आहे. याचा वापर करून, तुम्ही तुमच्या एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डवरून भरू शकता. हे तुम्हाला ऐकायला खूप फायदेशीर वाटत असेल की, शॉपिंगचं बिल फेडण्यासाठी आधी 30-45 दिवस मिळाले आणि नंतर दुसऱ्या क्रेडीट कार्डने पहिल्याचे बिल भरले, त्यामुळे शॉपिंगचे बिल भरायला 2-3 महिन्यांचा अवधी मिळेल. पण हे बॅलेन्स ट्रान्सफर फ्रीमध्ये नाही. त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेला चार्ज भरावे लागेल. त्याचा आणखी एक मोठा तोटा आहे. क्रेडिट कार्ड हा कर्जाचा एक प्रकार आहे. अशा वेळी, जर तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरले तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एका कर्जाची पुर्तता करण्यासाठी दुसरे कर्ज घेत आहात. आपत्कालीन परिस्थितीत, तुमच्याकडे पैशांची तीव्र कमतरता असते, तेव्हा बॅलन्स ट्रान्सफर करायला हरकत नाही, पण त्याची सवय करून घेऊ नका. हे जास्त केल्याने तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या