मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून वाढत चाललेली महागाई पाहता CNG आणि PNG चे दरही वाढतच आहेत. मात्र आता हे दर कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे CNG आणि PNG चे दर कमी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला. पीएनजी आणि सीएनजी स्वस्त आता स्वस्त होणार आहेत. यासोबतच नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
RBI कडून रेपो दर स्थिर; सर्वसामान्यांना फायदा होणार की तोटा?यासाठी 2014 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2 वर्षात किंमत 8.57 डॉलरने वाढली आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने सुधारित घरगुती गॅस किंमतीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे.
त्यात नमूद करण्यात आले आहे की स्थिर किंमत निश्चित करण्यासाठी आणि बाजारातील प्रतिकूल चढउतारांपासून उत्पादकांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
How to Save Tax: नवीन आर्थिक वर्षात कसा सेव्ह करावा टॅक्स? या टिप्स ठरतील फायदेशीरया निर्णयानंतर दिल्लीत सीएनजीची किंमत जवळपास 6 रुपयांनी कमी होणार आहे. पीएनजीची किंमत 6 रुपयांनी कमी होणार आहे. मुंबईत सीएनजीचे दर आठ रुपयांनी तर पीएनजीचे दर पाच रुपयांनी कमी होणार आहेत. बंगळुरूमध्ये सीएनजीची किंमत 6 रुपयांनी आणि पीएनजीची किंमत 6.50 रुपयांनी कमी होणार आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात 5 रुपयांची कपात होणार आहे.