कार लोन घेताना लक्षात ठेवा या गोष्टी
मुंबई, 27 मे : बहुतेक लोकांना त्यांच्या आवडीची कार खरेदी करायची असते. परंतु बजेट नसल्यामुळे ती खरेदी करणं शक्य होत नाही. अशा वेळी बँकां देत असलेलं कार लोन कामी येतं. तुम्हीही बँकेकडून कर्ज घेऊन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्ही अवश्य वाचायला हवी. तुम्ही कार लोनसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याचा विचार करत आहात, परंतु त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक असतं. कार लोन हे नवीन आणि जुन्या दोन्ही गाड्यांसाठी घेतलं जाऊ शकतं. न्यू कार लोन : हे कार लोन नवीन कार खरेदी करण्यासाठी घेतलं जातं यूज्ड कार लोन : या कार लोनचा व्याजदर नवीन कार लोकनच्या व्याजापेक्षा जास्त असतो. याचे गाइडलाइनही खूप क्लिष्ट आहेत. सुरक्षित कार कर्ज: या कर्जाअंतर्गत, कार कॉलेट्रल म्हणून वापरली जाते. या कर्जाअंतर्गत डिफॉल्ट असल्यास, कर्ज देणारा कारही जप्त करू शकतो. अनसिक्योर्ड कार लोन: या लोनमध्ये सामान्यतः हाय इंटरेस्ट रेट आणि अधिक कठोर नियम असतात. प्री-अप्रूव्ड कार लोन: या कर्जाअंतर्गत, कर्जदाराला विशिष्ट रकमेपर्यंतच्या कर्जासाठी पहिलेच मंजूरी मिळालेली असते. ज्याचा वापर कार खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
ATM मधून फाटक्या नोटा निघाल्या तर डोंट वरी, अशा करता येतील चेंजकाल लोन अप्रूव्हलसाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या क्रेडिट आणि लोनवर दिलेला व्याजदर ठरवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना कमी व्याज द्यावे लागते. यासोबतच बजेटविषयी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ईएमआय पेमेंट करण्यासाठी तुम्ही तुमच्या महिन्याचे उत्पन्न आणि खर्च विचारात घेणे महत्त्वाचे आहे. कार घेताना जास्त डाउन पेमेंट केल्याने कर्जाची रक्कम कमी होते, ज्यामुळे ईएमआय आणि व्याज खर्च कमी होऊ शकतो.
होम लोनवर वाचवता येईल बक्कळ टॅक्स! फक्त ही ऑफर विसरु नकाअनेक तज्ञ कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी कारच्या ऑन-रोड किमतीच्या किमान 20% डाउन पेमेंट म्हणून भरण्याची शिफारस करतात. जेव्हा तुम्ही कार लोनसाठी अर्ज करता तेव्हा तुमचा ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला बँका आणि इतर संस्थांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमिट केला जाऊ शकतो.