3. ज्या खोलीत तिजोरी किंवा लॉकर ठेवले आहे ती खोली इशान्य किंवा वायव्य कोनात नसावी.
नवी दिल्ली, 1 एप्रिल : नवं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. घर खरेदी करण्याचं स्वप्न काहीसं महागणार (Buying New House Become Expensive) आहे. राज्य सरकारच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागाने रेडी रेकनरच्या दरात वाढ (Ready Reckoner Price Increased) केली आहे. राज्यात सरासरी रेडी रेकनरच्या दरात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 6.96 टक्के इतकी दरवाढ झाली आहे. पालिका क्षेत्रात 8.80 टक्के, तर नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के रेडी रेकनरचे दर वाढवले गेले आहेत. मुंबईत रेडी रेकनरच्या दरात 2.34 टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक बदल झाले असून याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.
रेडी रेकनर अर्थात जमिनीच्या वार्षिक बाजार मूल्य दरात वाढ झाली आहे. बाजार मूल्य दर वाढल्याने घरं आणि जमिनीच्या किमतीत मोठी वाढ होईल. तसंच आजपासून घर खरेदीवर 1 टक्का मेट्रो सेसही भरावा लागणार आहे. मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर 1 टक्के मेट्रो सेस अर्थात उपकर भरावा लागेल. या 1 टक्के मेट्रो सेसमधून जमा होणारा महसूल मेट्रो, उड्डाणपूल आणि वाहतुकीशी संबंधिक इतर प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल.
राज्य सरकारकडून दरवर्षी नवीन रेडी रेकनरचा दर जारी केला जातो. गुरुवारी हा नवा दर जाहीर करण्यात आला. मागील वर्षी कोरोनामुळे रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र यंदा 2022-23 साठी सरासरी 5 टक्के इतकी रेडी रेकनर दरवाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर सर्व जिल्ह्यांच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून या नव्या रेडी रेकनरच्या दराची अंमलबजावणी होईल.
तसंच बांधकाम खर्चात वाढ झाल्यानंही घरांच्या किमतीत 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. सिमेंट, स्टिलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने घरांच्या किमती वाढतील असं CREDAI ने म्हटलं आहे.