मुंबई, 25 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Share Market) काल मोठी पडझड पाहायला मिळाली. काल म्हणजेच 24 फेब्रुवारीच्या व्यवहारात निफ्टीने 16,400 वर असलेला महत्त्वाचा सपोर्ट तोडला आणि त्याच्या खाली बंद झाला. बाजारातील नकारात्मक भावना कायम राहण्याचे हे लक्षण आहे. मासिक चार्टवर, मार्च 2020 नंतर प्रथमच निफ्टी 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असल्याचे दिसले. डेली चार्टवर, निफ्टी जुलै 2020 नंतर प्रथमच त्याच्या 200-दिवसांच्या SMA (16,894) च्या खाली गेला होता. निफ्टीला 16,400 आणि 16,894 वर रजिस्टन्स आहे. त्यानंतर पुढील रजिस्टन्स 17,220 आणि 17,490 वर आहेत. नकारात्मक बाजूने, निफ्टीला 15,834 (ऑगस्ट 2021 कमी) आणि नंतर 15,450 वर महत्त्वाचा सपोर्ट आहे. काल आलेल्या इतिहासातील पाचव्या मोठ्या घसरणीतून सावरत शेअर बाजाराने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. बाजार उघडताच सेन्सेक्सने 55 हजारांची पातळी ओलांडली आणि व्यवहाराच्या दोन तासांत 56 हजारांच्या वर पोहोचला. सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्स 792 अंकांनी वाढून 55,322 वर उघडला आणि निफ्टीही 268 अंकांच्या मजबूत उसळीसह 16,515.65 वर उघडला. गुंतवणूकदारांनी आज जोरदारपणे शेअर्स खरेदी केले आणि सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 1,152 अंकांच्या वाढीसह 55,678 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 357 अंकांनी वाढून 16,604 वर पोहोचला. Apollo Hospital शेअरमध्ये जोरदार उसळी, मार्चपासून शेअर Nifty 50 मध्ये समावेश होणार जीईपीएल कॅपिटलचे विद्यान सावंत यांनी काही शेअर्सची शिफारस केली आहे, जे 2-3 आठवड्यात चांगला परतावा देऊ शकतात. हे शेअर्स या कालावधीत 26 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. क्रॉम्प्टन ग्रीव्हज ग्राहक इलेक्ट्रिकल (Crompton Greaves Consumer Electrical) या शेअरमध्ये खरेदीची शिफारस देण्यात आली आहे. 370 च्या स्टॉप लॉससह 512 रुपयांच्या टार्गेटसाठी क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यांत 26 टक्के परतावा देऊ शकतो. Emergency Fund : संकटकाळात कमी वेळेत पैसे कसे जमवायचे? काय आहेत विविध पर्याय? युनायटेड स्पिरिट्स (United Spirits) या शेअरमध्ये 790 च्या स्टॉपसह खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 1,020 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 21 टक्के परतावा देऊ शकतो. सुप्रीम इंडस्ट्रीज (Supreme Industries) सुप्रीम इंडस्ट्रीजमध्ये 1870 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 2465 रुपायांचे टार्गेट देण्यात आले आहे. स्टॉक येत्या 2-3 आठवड्यात 21 टक्के परतावा देऊ शकतो.