मुंबई, 07 जानेवारी: तुम्ही जर व्यवसाय (New Business) करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी योग्य संधीची वाट पाहात असाल तर कमी पैशांमध्ये अधिक नफा मिळवून देणारा एक व्यवसाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या व्यवसायासाठी खास कंपनीकडून ट्रेनिंगही दिलं जातं. त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही नेमकं काय करणं आवश्यक आहे पाहा. (Business Plan) नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉरपोरेशन (NSIC) च्या इन्क्यूबेशन प्रोग्रामनुसार सोया मिल्क तयार करण्याचा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे. या व्यवसायाचे खास ट्रेनिंग तुम्हाला देण्य़ात येईल. या व्यवसायासाठी तुम्ही सरकारी योजनेतून कर्ज घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्य़ाजवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये आहेत तर तुम्ही सोया मिल्क मेकिंग यूनिट सुरू करू शकता. उत्पादन खर्च NSICच्या अहवालानुसार सोया मिल्क मेकिंग यूनिटसाठी एकूण 11 लाख रुपये खर्च येतो. मात्र सुरुवातीला तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही मुद्रा योजनेतून बँक लोन घेऊ शकता. बँकेकडून तुम्हाला जवळपास 80 टक्के कर्ज मिळेल तुम्हाला वरचा दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च काढायचा आहे. NSIC संस्थेकडून मिळणार ट्रेनिंग हा व्यवसाय कसा करायचा इथपासून त्याचं मार्केटिंग कसं करायचं याचं सर्व ट्रेनिंग कंपनीकडून तरुणांना मिळणार आहे. त्या ट्रेनिंगनंतर तुम्ही व्यवसाय करू शकता. या ट्रेनिंगचा फायदा तुम्हाला व्यवसायात होणार आहे. उत्पादन करण्यासाठी किती जागा आवश्यक हेही वाचा- सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; इतिहासात पहिल्यादाच सोन्याने गाठली एवढी उंची NSICच्या अहवालानुसार सोया मिल्कचं उत्पादन घेण्यासाठी एक छोटं यूनिट उभं करण्यासाठी तुम्हाला किमान 100 स्क्वेअर फूट जागा आवश्यक आहे. ही जागा तुमची स्वत:ची असेल तर खर्च कमी होईल तर भाज्यानं घेतली तर त्याचे भाडंही खर्चात धरावं लागेल. इतर सामग्रीसाठी लागणारा खर्च या उत्पादनासाठी तुम्हाला काही मशीन आणि इक्विपमेंट घ्यावा लागणार आहेत. ग्राइंडर, कुकर, वायलर, मेकॅनिकल फिल्टर प्रेस, टोपो बॉक्स, सोकिंग टँक यासारखे अनेक साहित्य घ्यावं लागणार आहे. प्रोडक्शन प्रोसेस सोयाबीनला तीन पट पाण्यात 4 ते 6 तास भाजवून ठेवा. त्यानंतर 12 तासांसाठी पुन्हा थंड तापमानामध्ये हे भिजवलेलं सोयाबीन ठेवा. भीजलेले सोयाबीन ग्रायडर आणि कुकिंग मशीनमध्ये ठेवा आणि त्याला 120 डिग्री सेल्सिय़सवर 10 मिनिटं गरम करा. त्यानंतर या दुधाला पॅकिंग करा. किती होईल कमाई या संपूर्ण सेटअपमध्ये साधारण तुम्ही 1 लाख 75 हजार लीटर सोया मिल्क तयार करू शकता. प्रत्येक लिटरमागे 30 रुपये खर्च होऊ शकतो. सगळा खर्च बाजूला काढून तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंत वर्षाला कमाई होऊ शकते. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही http://www.nsic.co.in/NTSC/Main.aspx संकेतस्थळाला भेट देऊ शकता. हेही वाचा- घरात ठेवलेल्या सोन्यावर आहे बँकांची नजर, मोदी सरकारचे नवे आदेश