JOIN US
मराठी बातम्या / मनी / प्लॅस्टिक बंदीनंतर 1 लाख रुपये गुंतवा आणि सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल भरपूर कमाई

प्लॅस्टिक बंदीनंतर 1 लाख रुपये गुंतवा आणि सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल भरपूर कमाई

Plastic Ban, Government - 2 ऑक्टोबरपासून संपूर्ण प्लॅस्टिक बंदी सुरू होतेय. त्याचा फायदा चांगला व्यवसाय सुरू करण्यासाठी करून घ्या

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : 1 ऑक्टोबरनंतर मोठे बदल होणार आहेत. 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लॅस्टिकच्या बॅग्ज, कप आणि स्ट्राॅवर बंदी येणार आहे. 2 ऑक्टोबरपासून मोदी सरकार प्लॅस्टिकच्या 6 वस्तूंवर बंदी आणणार आहेत. भारतात वाढणाऱ्या प्रदूषणाला थांबवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या व्यवसायाची संधी मिळणार आहे. इतकी करा गुंतवणूक 1 ते 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे खास कौशल्याची गरज नाहीय. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय केलात तर खर्च वाढेल, पण कमाई चांगली होईल. अर्थात, कमाई व्यवसाय कुठे करताय, तो किती मोठा आहे, यावर अवलंबून असते. खूशखबर! 8 दिवसांनी ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मिळाला दिलासा कपड्याची बॅग बनवून विकू शकता प्लॅस्टिक बंद झाल्यानंतर बाजारात कपड्यांची दुकानं, मिठाईचं दुकान, वाण्याचं दुकानं इथे कपड्यांच्या बॅगा लागणार आहेत. त्यामुळे कापडी पिशव्यांची मागणी वाढणार आहे. म्हणूनच हा व्यवसाय सुरू करणं हा चांगला पर्याय आहे. प्रत्येक स्थानिक बाजारात कापडी पिशव्यांची मागणी असेल. आता हेल्थ इन्शुरन्स घेणं झालं सोपं, झालेत ‘हे’ मोठे बदल बॅग बनवण्यासाठी या गोष्टींची गरज मशीन्सबद्दल सांगायचं तर या व्यवसायासाठी ऑटोमेटिक Non Woven Bag Making Machineही मिळतात. पण त्या महाग पडू शकतात. त्यामुळे सुरुवातीला शिवण मशीन, कात्री एवढंच पुरेसं होईल. तुम्हाला सेकण्ड हँड शिवण मशीन बाजारात 2 हजार ते 5 हजाराला मिळेल. त्यामुळे कापडी पिशव्या तयार करणं सोपं होईल. ICICI बँक सुरू करणार 450 शाखा, 3500 कर्मचाऱ्यांना मिळणार नोकऱ्या तसंच, प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर थर्मोकाॅल प्राॅडक्टमध्ये खूप फायदा आहे. प्लॅस्टिकवर सगळीकडे बंदी घातल्यावर थर्मोकाॅल आणि पेपर प्राॅडक्टची मागणी वाढलीय. थर्मोकाॅल कप-प्लेट बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये खर्च करावे लागतील. सुरुवातीला कसली विक्री करायची हे ठरवावं लागेल. मग कच्चा माल खरेदी करून व्यवसाय सुरू करता येईल. पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या