JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business idea: निशिगंधाचं फूल तुम्हाला करेल मालामाल! कमी गुंतवणुकीत सुरु करा जबरदस्त बिझनेस

Business idea: निशिगंधाचं फूल तुम्हाला करेल मालामाल! कमी गुंतवणुकीत सुरु करा जबरदस्त बिझनेस

Business idea: निशिगंधाचं फूल अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यासोबतच हे सुगंधितही आहे. याचा बिझनेस केला तर किती फायदा होऊ शकतो याविषयी आपण जाणून घेऊया.

जाहिरात

बिझनेस आयडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 एप्रिल: आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. ज्या व्यवसायात कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल अशा बिझनेसच्या शोधात आपण असतो. तुम्हीही अशाच व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एक बेस्ट आयडिया सांगणार आहोत. या व्यवसायात तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आपण निशिगंधाच्या शेतीविषयी बोलत आहोत.

निशिगंधाचे फूल अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यासोबतच सुंगधित फुलांमध्ये निशिगंधा फुलाचं एक वेगळं स्थान आहे. निशिगंधाची फुले दीर्घकाळ ताजी आणि सुगंधित राहतात. त्यामुळे बाजारात त्याची मागणी जास्त आहे. अशा वेळी शेती करून भरपूर नफा कमावता येतो. निशिगंधा म्हणजेच पोलोएंथस ट्यूबरोज लिनचा उगम मेक्सिको देशात झाला आहे. हे फूल Amaryllidaceae जादीची एक वनस्पती आहे.

भारतातील या राज्यांमध्ये केली जाते या फुलाची लागवड

पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यासह भारतातील इतर राज्यांमध्ये निशिगंधाची लागवड केली जाते. एवढच नाही तर कोणत्याही हवामानात त्याची लागवड करता येते. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था असेल अशा ठिकाणी त्याची लागवड चांगली होईल, म्हणजेच पाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था नसेल तर त्याचे कंद कुजून पिकाचे नुकसान होते.

ATM मधून एका दिवसात किती काढता येतात पैसे? तुम्हाला माहितीय का हा नियम?

नैसर्गिक खतांचा करा वापर

चांगल्या पिकासाठी शेतात एकरी 6-8 ट्रॉली शेणखत टाकावं लागेल. तसेच तुम्ही NPK किंवा DAP सारखी खतं वापरू शकता. यामध्ये बटाट्यांप्रमाणे कंदांची लागवड केली जाते. एका एकरात सुमारे 20 हजार कंद वापरले जातात. नेहमी ताजे, चांगले आणि मोठे कंद लावा, जेणेकरून तुम्हाला फुलशेतीमध्ये चांगले उत्पादन मिळेल.

जाणून घ्या, किती मिळणार कमाई?

तुम्ही एक एकर जमिनीत निशिगंधाच्या फुलाची लागवड केली तर निशिगंध फुलाच्या सुमारे 1 लाख स्टिक मिळतात. तुम्ही त्यांना जवळच्या फुलांच्या मंडीत विकू शकता. जवळच एखादं मोठं मंदिर, फुलांची दुकानं, लग्नघर वगैरे असेल तर तिथून फुलांना चांगला भाव मिळू शकतो. तर निशिगंधाचं एक फूल मागणी आणि पुरवठा यानुसार दीड ते आठ रुपयांना विकले जाते. म्हणजेच एका एकरात निशिगंध फुलांच्या लागवडीतून तुम्ही दीड ते सहा लाख रुपये कमवू शकता.

ट्रेनमध्ये सामान पार्सल पाठवायचेय? मग ‘हे’ नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत

संबंधित बातम्या

या गोष्टींमध्ये केला जातो वापर

भारतात सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रात निशिगंधाच्या फुलांची लागवड केली जाते. त्याचबरोबर फ्रान्स, इटली, दक्षिण आफ्रिका, अमेरिका इत्यादी देशांमध्येही याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. निशिगंधाची फुले त्यांच्या सुगंधामुळे खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा वापर, हार, केसात माळण्यासाठी आणि विवाहांमध्ये सजावट म्हणून केला जातो. तसेच परफ्यूम बनवण्यासाठीही याचा वापर होतो. निशिगंधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या व्यवसायातून मोठी कमाई करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या