मुंबई : तुमच्याकडे जर जमीन असेल किंवा तुम्ही शेती करण्यासाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही आयडिया सर्वोत्तम आहे. कमी खर्चातही अत्यंत गुणकारी असलेल्या आल्याची शेती करून तुम्ही लाखो रुपयांचा नफा कमवू शकता. यामधून तुम्ही बंपर नफा कसा मिळवू शकता याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारत हा कृषिप्रधान देश आहे हे तुम्हाला माहीत आहेच. भारतातील सुमारे 58 टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेचे साधन शेती आहे. आज अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत आणि लाखो रुपये कमावत आहेत. आता शेतीशी संबंधित व्यवसायासाठीही सरकार मदत करत आहे. आल्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात मसाला, औषध एवढंच नाही तर सौंदर्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही अंशी उत्पादनांमध्येही केला जातो. आल्याला अगदी वैदिक काळापासून महत्त्व आहे. चहापासून भाज्या आणि लोणच्यापर्यंत याचा वापर केला जातो. वर्षभर मागणी चांगली राहण्यासोबतच भावही चांगला मिळतो. हिवाळा आणि पावसाळ्यात त्याला मोठी मागणी असते. यामध्ये तुम्ही नोकरीपेक्षा जास्त नफा मिळवू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या लागवडीसाठी केंद्र सरकारकडूनही मदतही मिळते. आल्याची लागवड उष्ण व दमट ठिकाणी केली जाते. आल्याच्या गाठी तयार होण्यासाठी पेरणीच्या वेळी मध्यम पावसाची आवश्यकता असते. आल्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. याची लागवड एकट्याने किंवा पपई आणि इतर मोठ्या झाडांच्या पिकांसोबत करता येते. एक हेक्टरमध्ये पेरणीसाठी २ ते ३ क्विंटल बियाणे आवश्यक आहे.
Amazonसोबत फक्त 4 तास काम करा, दरमहा होईल 60,000 रुपयांपर्यंत कमाईआल्याची लागवड बेड तयार करून करावी. याशिवाय मधोमध नाले करूनही पाणी सहज वाहून जाते. आल्याची लागवड पाणी साचलेल्या शेतात करू नये. आले लागवडीसाठी 6-7 pH असलेली माती चांगली मानली जाते. आल्याच्या आधीच्या पिकाचे कंद बिया म्हणून वापरले जातात. आल्याचे कांदे एका ओळीमध्ये ३० ते ४० सेंटीमीटर अंतराने लावावेत. याशिवाय चार ते पाच सेंटीमीटर खोल हे आल्याचे कांदे तुम्हाला लावायचे आहेत. त्याला मातीने झाकून द्या. अति पाणी देखील आल्यासाठी घातक ठरू शकतं त्यामुळे ते होणार नाही याची काळजी घ्या. आल्याची शेती करताना साधारण ते तयार होऊन आलं काढणीला येईपर्यंत ८ ते ९ महिन्यांचा कालावधी जातो. साधारण १५० ते २०० क्विंटल आलं एक हेक्टरमागे लावावं लागतं. हेक्टरमागे ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च तुम्हाला येऊ शकतो.
घराच्या छतावर ‘ही उपकरणं बसवण्यासाठी सरकार देईल अनुदान; व्यवसायातून कमवा लाखो रुपयेतुम्ही जर एवढी शेती केली तर तुम्हाला प्रती किलोला ८० रुपये भाव मिळतो. सुक्या आल्याचा भाव हा नेहमी ओल्यापेक्षा जास्त असतो. ६० रुपये किलोला जरी मिळाले तरी २५ लाख रुपयांपर्यंत तुम्ही कमाई करू शकता. यातून खर्च वगळला तरी तुम्ही १५ लाख रुपये नफा कमवता.